गेल्याच आठवड्यात होणारी आरोग्य विभागाची परीक्षा नियोजनाअभावी होऊ शकली नाही. त्यामुळे 24 ऑक्टोंबरला होणाऱ्या परीक्षेचे हॉल तिकीट परीक्षार्थींना मिळाला सुरुवात झाली असून त्यातल्या समस्या मात्र सुटायचं नावच घेत नाहीत.
सध्या हॉल तिकीटच्या सेंटरवरुन पुन्हा गोंधळ झाला आहे. एकाच दिवशी दोन परीक्षेसाठी दोन वेगळ्या जिल्ह्यात परीक्षा केंद्र आल्याने काही विद्यार्थी संभ्रमात पडले आहेत.मागील आठवड्यात होणारी आरोग्य विभागाची परीक्षा ऐनवेळी परीक्षेचे नियोजन होऊ न शकल्याने पुढे ढकलण्यात आली होती आणि या परीक्षेची तारीख 24 ऑक्टोबर आणि 31 ऑक्टोबर जाहीर करण्यात आली. 24 ऑक्टोबरला होणाऱ्या आरोग्य विभागाच्या परीक्षेचे हॉल तिकीट ऑनलाइन पद्धतीने उमेदवारांना प्राप्त होत आहेत.यातील काही हॉल तिकीटमध्ये ज्या उमेदवारांनी दोन वेगळ्या पदांच्या परीक्षेसाठी अर्ज केले आहेत. या उमेदवारांचे परीक्षेचे दोन पेपर एकाच दिवशी असून दोन परीक्षेचे केंद्र मात्र दोन वेगळ्या जिल्ह्यात आहेत.
शिवाय एक सकाळचा परीक्षेचा पेपर सकाळी 10 ते दुपारी 12 दरम्यान तर दुपारचा सेशनचा दुसऱ्या पदासाठीचा पेपर दुपारी 3 ते 5 या दरम्यान आहे.त्यामध्ये उमेदवारांनी दोन पेपर देण्यासाठी मधल्या दोन ते तीन तासात दोन जिल्ह्यांमध्ये दीडशे दोनशे किलोमीटर अंतर पार करणे शक्य नसल्याने हे पेपर एकाच दिवशी कसे द्यायचे असा प्रश्न उमेदवारांना पडला आहे? तर काही उमेदवारांनी अर्ज भरताना पर्याय म्हणून जवळचे जिल्ह्यातील केंद्र मिळावे असे नमूद केले असतानासुद्धा दूरच्या जिल्ह्यांमध्ये परीक्षा केंद्र मिळाले आहे
0 Comments