बार्शी! मोटरसायकल अडवून लूटमार करणाऱ्या आरोपीला तालुका पोलीस ठाणे यांनी केली अटक


बार्शी/प्रतिनिधी:।

मोटरसायकल अडवून लूटमार करणाऱ्या आरोपीला बार्शी तालुका पोलिसांनी अटक केली असून त्याच्याकडुन सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह चाळीस हजाराचा मुद्देमाल जप्त केला आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, फिर्यादी व त्याची पत्नी 30 जुलै रोजी रात्री साडेआठ वाजता बार्शी तालुक्यातील ताडसौदणे गावाजवळून प्रवास करत होते. त्यांची मोटरसायकल काढून अज्ञात चार व्यक्तिने त्यांच्याकडील सोन्याच्या दागिन्यांसह चाळीस हजाराचा मुद्देमाल लंपास केला होता. याबाबत तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलीस निरीक्षक शिवाजी जायपत्रे यांना मिळालेल्या गोपनीय बातमीद्वारे यांनी आरोपी निष्णाण करुन आरोपी नामे प्रशांत ऊसचिन
बापु काळे ऊर्फ पचार वय २३ वर्ष रा.तेरखेडा ता.वाशी जिल्हा - उस्मानाबाद यांचेवर वॉच ठेवनु , सदर
आरोपी हा तेरखेडा गावातील चौकात येणार आहे अशी गोपनीय माहिती मिळाली होती, आरोपी प्रशांत
ऊफंसचिन बापु काळे ऊर्फ पन्चार यास दिनांक २६/१०/२०२१ रोनी ताब्यात घेवुन बार्शी पोलीस ठाणे येथे आणुन त्यास विश्वासात घेवून तपास केला असता त्यांचे इतर तीन साथीदाराच्या मदतीने खालील गुन्हे
उघडकीस आणले.

ही कामगिरी पोलीस अधीक्षक तेजस्विनी सातपुते व उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक शिवाजी जायपत्रे यांच्या टीमने केली आहे. त्याच्या टीममध्ये सुभाष सुरवसे, राजेंद्र मंगरुळे, अभय उंदरे, अमोल माने, अभिजित गाठे त्यांनी ही कामगिरी केली आहे.

Post a Comment

0 Comments