गेल्या काही दिवसांपासुन भाजप नेते किरीट सोमय्या महाविकास आघाडी सरकारवर आरोप करत आहे. आता थेट मुंबईचे सहपोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. किरीट सोमय्यांनी दिल्ली येथे माध्यमांशी संवाद साधला त्यावेळी आरोप केले आहेत.
विश्वास नांगरे पाटील हे महाविकास आघाडी सरकारचे माफिया आहेत,असं धक्कादायक वक्तव्य किरीट सोमय्या यांनी केलं आहे. यावेळी बोलताना किरीट सोमय्या यांनी विश्वास नांगरे पाटलांनी मला गैरकायदेशीरपणे घरात कोंडून ठेवलं.
किरीट सोमय्यांनी माझ्याकडे विश्वास नांगरे पाटलांविरोधात पुरावे आहेत , असं देखील म्हटलं आहे. ज्यावेळेस नांगरे पाटील मला घरात कोंडून सुचना देत होते तेव्हा विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर आणि मिहीर कोटेचा तेथे उपस्थित होते. मला नजरकैदेत ठेवण्याची आदेश नव्हता तर नांगरे पाटलांनी मुलुंड पोलिसांवर कारवाई का केली नाही?, असा सवाल किरीट सोमय्यांनी उपस्थित केला आहे. विश्वास नांगरे पाटील यांना गृहमंत्री आश्वासन देत होते तर त्यांनी तसं सांगावं, असंही किरीट सोमय्या म्हणाले.
0 Comments