देवेंद्र फडणवीस सतत आघाडी सरकारवर टीका करताना दिसतात. राज्यात यावर्षी पावसानं मोठं नुकसान केलं आहे. महाविकास आघाडीचे नेते आणि विरोधी पक्ष भाजपचे नेते यांनी मराठवाड्याची नुकसान पाहणी केली. दरम्यान दोन्ही पक्षातील नेत्यांनी एकमेकांवर आरोप केले होते. आता मुंबई काॅंग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली आहे.
________________________________________
(Advertise)
-----------------------––---–---------------------------
देवेंद्र फडणवीस यांनी नुकतच मला अजुनही राज्याचा मुख्यमंत्री वाटत असल्याचं वक्तव्य केलं होतं. या वक्तव्यानंतर राज्यभरातून फडणवीस यांच्यावर जोरदार टीका झाली होती. भाई जगताप यांनी फडणवीस यांच्या याच वक्तव्याचा चांगलाच समाचार घेत फडणवीस यांचं मानसिक संतुलन बिघडल्याची टीका केली आहे. पाच वर्षात राज्याची वाट लावणारा मुख्यमंत्री कोण असेल तर ते फडणवीस आहेत, या तिखट शब्दात भाई जगताप यांनी फडणवीस यांच्यावर टीका केली आहे.
0 Comments