बार्शी शहर आणि तालुक्यात काँग्रेस कार्यकर्ता संवाद अभियान ; सोलापूर काँग्रेस जिल्हा अध्यक्ष डॉ. धवलसिंह मोहिते पाटील यांची उपस्थिती


बार्शी/प्रतिनिधी:
         
बार्शी येथे आगळगाव रोड येथील यश लॉन्स या सांस्कृतिक भवनामध्ये सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष डॉ. धवलसिंह मोहिते पाटील यांच्या उपस्थितीत काँग्रेस कार्यकर्ता संवाद अभियान संपन्न झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष जुगलकिशोर तिवाडी हे उपस्थित होते.

 डॉ. धवलसिंह मोहिते पाटील यांची  जिल्हाध्यक्ष पदी निवड झाल्यानंतर त्यांनी काँग्रेस पक्षाची  सोलापूर जिल्ह्यात संघटन बांधणी तसेच ब्लॉक बूथ निहाय कार्यकर्त्यांचा आढावा घेऊन कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यासाठी मागील एक महिन्यापासून सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात कार्यकर्त्यांशी संवाद साधण्याची अभियान हाती घेतले आहे. त्याचाच एक भाग म्हणून दिनांक २७ ऑक्टोबर रोजी बार्शी तालुक्याचा व शहराचा काँग्रेस पक्षाचा आढावा घेण्यासाठी डॉ.धवलसिंह मोहिते-पाटील बार्शी तालुक्यातील बार्शी व वैराग शहरासह खांडवी, सौंदरे, ढोराळे,मळेगाव, शेलगाव, नारी, कारी या गावामध्ये कार्यकर्त्यांच्या संवादासाठी उपस्थित राहिले.
तालुका मुख्यालय म्हणून बार्शी शहरांमध्ये कार्यकर्ता समाज अभियानाच्या निमित्ताने बार्शी शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष ॲड. जीवनदत्त आरगडे यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षाचा मेळावा आयोजित करण्यात आला.या मेळाव्यात बोलताना डॉ. धवलसिंह मोहिते पाटील यांनी यावेळी पक्ष संघटना वाढीसाठी काँग्रेसच्या  विचारांना घराघरात मनामनात पोचवण्यासाठी कार्यकर्त्यांनी हिरीरीने कामाला लागून वार्ड निहाय ,बूथ निहाय पक्ष संघटनेच्या शाखा स्थापन करून सर्वांना सामावून घेऊन पक्ष बळकट करण्याचा संदेश दिला. त्याचबरोबर  जो कार्यकर्ता पक्ष कार्यासाठी समर्पित पाहून घेईल त्याला न्याय देताना भविष्यात आयाराम गयाराम यांची गय न करता निष्ठावंतांना न्याय देण्याची भूमिका मांडली. पक्ष बांधणी करून उपक्रमशील राहून सामान्य जनतेशी एक आपुलकीचे नाते तयार करणे गरजेचे आहे.असेही पुढे बोलताना ते म्हणाले.

कार्यक्रमाचे संयोजक बार्शी शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष ॲड. जीवनदत्त आरगडे यांनी देशामध्ये सध्या काँग्रेस पक्षाने नेहरू गांधी यांच्या नेतृत्त्वाखाली महत्प्रयासाने संगोपन व संवर्धन केलेली लोकशाही धोक्यात असल्याने भारतीय जनता पार्टी सारख्या अराजक भांडवलदारांच्या हातातील बाहुले असलेल्या धर्मांध देशविघातक पक्षाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी काँग्रेस पक्षातील कार्यकर्त्यांनी विचारांची लढाई लढून काँग्रेस पक्षाचे विचार सर्वसामान्य जनतेच्या सामाजिक न्यायाच्या दृष्टीने सर्वान पर्यंत पोहोचवावेत.  जाती धर्म परंपरा या घराच्या चौकटी च्या आत धर्म स्वातंत्र्य व्यक्तिस्वातंत्र्य म्हणून ठेवाव्यात घराच्या दरवाज्याच्या बाहेर पडल्यानंतर सबंध भारत वासियांचा एकच धर्मग्रंथ ते म्हणजे भारतीय संविधान व एकच धर्म ते म्हणजे राष्ट्रधर्म असला पाहिजे. व्यक्तिगत जीवनातील धर्माबाबत विविध वादग्रस्त विधाने अथवा संभ्रम तयार करून हिंदुत्व आणि अहिंदूद्वेष या भावनेतून संभ्रम पसरवून फक्त हिंदू धर्माचे संरक्षक आहोत असे चित्र मोठ्या कारस्थान आणि तयार करून भारतीय जनता पार्टी विकास बेरोजगारी , महागाई यांसह अनेक राष्ट्रीय समस्यांपासून भारतीय जनतेला भरकटत आहे त्यामुळे काँग्रेस पक्ष हाच देशासमोर सक्षम पर्याय म्हणून उभा असल्याने देशात सत्ता यायची असेल तर गावातूनच सुरुवात करायला पाहिजे असे त्यासाठी आगामी बार्शी नगरपरिषद निवडणुकीत बार्शीकर जनतेसमोर काँग्रेस पक्षाचा पर्याय म्हणून निवडणुकांना सामोरे जाईल.त्यासाठी आवश्यक असलेले खंबीर जिल्हाध्यक्ष लाभले आहेत.काँग्रेस पक्षाचे  विचार मूर्त स्वरूपात आणण्यासाठी आवश्यक असलेला चेहरा डॉ.धवल मोहिते पाटील यांच्या रूपाने जिल्हा काँग्रेसला मिळाला आहे. असे विचार ॲड.जीवनदत्त आरगडे यांनी व्यक्त केले. 

 कार्यक्रमाचे अध्यक्ष सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष जुगलकिशोर तिवाडी यांनी काँग्रेस पक्षाने आता कातडीबचाव, पडखाऊ, व मवाळ धोरण सोडून न्यायनिष्ठुर भूमिकेतून आक्रमक होण्याची गरज आहे. त्याचबरोबर केंद्रातील सत्तेच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टी प्रसारमाध्यमांना हाताशी धरून देशासह काँग्रेसचा इतिहास बदलण्याचा आणि मोदींनीच देशात विकास पर्व जणू आणले आहे असे आभासी चित्र निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहे त्याचा सामना करण्यासाठी काँग्रेस कार्यकर्त्यांनी आक्रमक होणे गरजेचे असून यासाठी पक्षांकडून प्रशिक्षित सर्वांच्या फळ्या हजारोंच्या संख्येने उभा करण्याची गरज असल्याचे मनोगत व्यक्त केले.

यावेळी सोलापूर जिल्हा महिला काँग्रेस अध्यक्षा तथा मोहोळ नगराध्यक्षा शाहीन शेख यांनी महागाई आणि बेरोजगारी वर लक्ष केंद्रित करून भाजप वर टीका केली. जिल्हा सरचिटणीस माजी जिल्हा परिषद सदस्य तेजस्विनी मरोड  सोलापूर जिल्हा काँग्रेस सांस्कृतिक विभागाच्या अध्यक्षा कविता कदम, यांनी समयोचित भाषणे केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शहर उपाध्यक्ष निलेश मांजरे पाटील यांनी केले. तर आभार प्रदर्शन तालुका कार्याध्यक्ष तानाजी जगदाळे यांनी केले. यावेळी सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटी सरचिटणीस दत्ता गाढवे,गोविंद पंके, अमोल भूमकर, तालुका कार्याध्यक्ष सतीश पाचकुडवे, ज्येष्ठ कार्यकर्ते बप्पा सुतार, युवा नेते रविकिरण कानगुडे,ओबीसी विभागाचे तालुका अध्यक्ष रमेश खांडेकर, आरोग्य विभागाचे जिल्हा अध्यक्ष वहाब फत्तेखा पठाण, सोलापूर जिल्हा काँग्रेस सेवादल यंग ब्रिगेड अध्यक्ष डॉ. विजय साळुंखे,सोशल मीडिया जिल्हा संयोजक ॲड. निवेदिता आरगडे,  अल्पसंख्यांक जिल्हा संयोजक वसीम पठाण उपस्थित होते. कार्यक्रमाची नियोजन शहर उपाध्यक्ष निलेश मांजरे पाटील, युवक काँग्रेसचे संतोष शेट्टी, शहर सरचिटणीस जहीर बागवान, ईश्वर व्हनकळस, उमेश मस्तूद ,महेश पवार यांनी केले. 


महत्त्वाची चौकट - 

तालुक्याचा दौरा सुरू करताना सकाळी डॉ. धवल सिंह मोहिते पाटील यांनी भगवंत दर्शनापासून सुरुवात केली त्यावेळी भगवंत  देवस्थान समितीच्या वतीने अध्यक्ष दादासाहेब बुडूख यांनी डॉ. मोहिते-पाटील यांचा भगवंत सत्कार केला. यावेळी मंदिराचे बडवे ॲड.कैलास बडवे यांनी उपस्थितांना श्री अंबरिष माहात्म्य आणि भगवंत प्रकट अख्यायिका कथा सांगितली.

 
महत्त्वाची चौकट  -

 डॉ. धवलसिंह मोहिते पाटील यांच्या हस्ते काटेगाव येथील राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक माजी तालुकाध्यक्ष जनाब इस्राईल अब्दुल पटेल, शिराळे येथील माजी सरपंच तथा राष्ट्रवादीचे विभाग प्रमुख जयराम विठ्ठल पकाले, खांडवी येथील युवा नेते जयराम नलवडे कृष्णकुमार गव्हाणे तसेच बार्शी शहरातील प्रसिद्ध महाराष्ट्र बँड चे संचालक अय्याय्जभाई शेख, फत्याजभाई शेख, अश्पाक भाई शेख यांचा काँग्रेस पक्षात प्रवेश घेण्यात आला. मोहिते पाटील यांच्या हस्ते त्यांचे पक्षात स्वागत करण्यात आले. अय्याजभाई शेख यांना जिल्हा सांस्कृतिक अध्यक्ष कविता कदम यांनी बार्शी तालुका सांस्कृतिक विभागाची तालुका अध्यक्ष पदाची जबाबदारी देण्यात आली.

Post a Comment

0 Comments