करमाळा! निमगाव (ह) येथील मागासवर्गीय शेतकरी बांधव न्यायासाठी मुला बाळांसह उपोषणास


करमाळा/प्रतिनिधी:

निमगाव (ह) मागास वर्गीय शेतकरी हनुमंत जगताप व  नारायण जगताप यांच्या जमीन गट ८० मध्ये मारुती नीळ व इतर ८ लोकांनी ओढा पात्र ढकलून शेतीचे नुकसान केले आहे. तो ओढा मुळ गाव नकाशात दाखवल्याप्रमाणे काढून द्यावा व मारुती नीळ वैगरे लोक यांच्या विरूद्ध कारवाई करून पोलीस संरक्षण मिळावे, यासाठी आज सकाळी पासून तहसील कार्यालय करमाळा समोर वयोवृद्ध माता पिता व बायका मुलाबाळासह उपोषणास बसलेले आहेत. 

या शेतकऱ्यांना तात्काळ न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी करत या उपोषण कर्ते यांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुका अध्यक्ष संतोष वारे, आदिनाथ चे माजी संचालक दत्तात्रय जगदाळे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक सतीश नीळ, मांगीचे राजेंद्र बागल, समाजसेवक राजाभाऊ वीर, माजी सरपंच संभाजी पाटील, सोसायटी संचालक राजेंद्र भोसले, माजी उपसरपंच विठ्ठल जगदाळे, आजिनाथ जगताप, कालिदास नीळ, सुदाम साळुंखे, संतोष सातपुते यांनी पाठिंबा दिला आहे.

Post a Comment

0 Comments