प्रियंका गांधी पोलिसांच्या ताब्यात राजकारण तापायला सुरुवात…


या व्यक्तीच्या कुटुंबियांना भेटण्यासाठी काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी  जात होत्या. त्यावेळी उत्तर प्रदेश पोलिसांनी त्यांनी यमुना एक्सप्रेस वे वर रोखलं आणि त्यांना ताब्यात घेण्यात आलं आहे. यावेळी पोलीस आणि काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये चांगलीच बाचाबाची झाल्याचं पाहायला मिळालं. लखनौ पोलिसांनी कलम १४४ आणि कायदा व सुव्यवस्थेचा हवाला देत प्रियंका गांधी यांना ताब्यात घेतलं आहे.
जगदीशपूरमध्ये सफाई कर्मचारी अरुण वाल्मिकी या तरुणाचा पोलीस कोठडीत मृत्यू झाला होता. या प्रकरणी पाच पोलिसांवर कारवाई करत त्यांचं निलंबन करण्यात आलंय. त्यानंतर आज प्रियंका गांधी या मृत अरुणच्या कुटुंबियांची भेट घेण्यासाठी दिल्लीवरुन निघाल्या होत्या. त्यावेळी यमुना एक्सप्रेस वे च्या एन्ट्री पॉईन्टवर पोलिसांनी प्रियंका यांचा ताफा अडवला. पोलिसांनी प्रियंका यांनी परत जाण्याचं आवाहन केलं. मात्र, प्रियंका गांधी पुढे जाण्यावर ठाम राहिल्या. त्यानंतर पोलिसांनी अखेर प्रियंका यांना ताब्यात घेतलं. त्यानंतर काँग्रेस कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले आणि त्यांनी उत्तर प्रदेशमधील योगी सरकारवर जोरदार घोषणाबाजी केली.

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीची तयारी करणाऱ्या काँग्रेसच्या राष्ट्रीय सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी मंगळवारी लखनौमध्ये सुमारे अर्ध्या लोकसंख्येची म्हणजे महिलांची मोठी घोषणा केली. प्रियंका गांधी म्हणाल्या की, आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्ष महिला उमेदवारांना 40 टक्के तिकिटे देईल. यासोबतच त्यांनी महिला समाजसेविका, शिक्षिका, महिला पत्रकार आणि इतर सेवांशी संबंधित महिलांना राजकारणात येण्याचे आवाहनही केले. त्या म्हणाल्या की, ज्याला स्वारस्य असेल त्यांनी पुढे येऊन अर्ज करा, आम्ही त्यांना तिकीट देऊ.


प्रियंका गांधी यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, पक्षाने यूपीतील शोषित महिलांबाबत हा निर्णय घेतला आहे. प्रियंका गांधी म्हणाल्या की, ‘मी एक मुलगी आहे, मी लढू शकतो’ हा काँग्रेसचा नारा आहे.आम्हाला पुढे जायचे असेल तर महिलांना राजकारणात यावे लागेल. गुणवत्तेच्या आधारावर महिलांना तिकीट दिले जाईल. आपल्याला जाती धर्माच्या गोष्टी सोडून दिल्या पाहिजे, असे प्रियांका गांधी म्हणाल्या.

Post a Comment

0 Comments