वैराग/प्रतिनिधी:
बार्शी तालुक्यातील धामणगाव (दु) येतील महादेव मंदिर व सटवाई देवस्थान ट्रस्टची स्थापना बोगस कागदपत्रांद्वारे करण्यात आली आहे, ती रद्द करून विश्वस्त मंडळावर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी भाजप युवा मोर्चाचे अध्यक्ष पांडुरंग नाना पाटील यांनी केली आहे.
खोटी कागदपत्रे दाखल करून केली नोंदणी
खोटी बोगस कागदपत्रे तयार करून महादेव मंदिर व सटवाई देवस्थान ट्रस्टची स्थापना करून तुकाराम काशिनाथ गुरव व सुनिल तुकाराम गुरव शासकीय नियमांची पायमल्ली करुन शासनाची फसवणूक केली आहे. संबंधित लोकावर कायदेशीर कारवाई करून धामणगावकर ग्रामस्थांना न्याय मिळावा, हि मागणी ग्रामस्थांतुन होत आहे.
विश्वस्त मंडळाने केली फसवणूक
सदरची महादेव मंदिर व सटवाई मंदिर दोन्ही मंदिरे गावातच असून त्याची नोंद सिटी सर्वे ऑफिस व ग्रामपंचायत कडे आहे. असे असतानादेखील गावापासून एक-दीड किलोमीटर बाहेर गट नंबर २८६ मध्ये त्याची नोंद दाखवली आहे. बेकायदेशीररित्या खोटी माहिती सांगून तयार करण्यात आलेली विश्वस्त मंडळ - तुकाराम काशिनाथ गुरव (अध्यक्ष), सचिन तुकाराम गुरव (सचिव), प्रभावती भगवान गुरव (खजिनदार), भगवान मुरलीधर गुरव (विश्वस्त), सचिन भगवान गुरव (विश्वस्त) हे सर्व जण राळेरास येथील रहिवासी असून त्यांना धामणगाव दूम मधील रहिवासी दाखवले आहे.
विश्वस्त मंडळावर कारवाई व्हावी
ह्या विश्वस्त मंडळावर वरदहस्त कोणाचा हा प्रश्नही नागरिकांतून उपस्थित केला जात आहे? बोगस ट्रस्टच्या माध्यमातून सटवाई मंदिर व महादेव मंदिर ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला जात आहे, यावर शासनाचाही मोठा खर्च झालेला आहे. तरी या बोगस विश्वस्त मंडळाची नोंदणी रद्द करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी करण्यात येत आहे.
ग्रामपंचायत मधील सत्ताधार्यांचा कानाडोळा
सगळी माहिती वस्तुस्थिती समोर आहे समोर असताना सुद्दा ग्रामपंचायत प्रशासन मात्र याकडे कानाडोळा करत आहे. ग्रामपंचायत मात्र मुग गिळून गप्प बसल्याचे चित्र दिसून येत आहे.
0 Comments