(Advertise)
कुठे अतिवृष्टी तर कुठे सततचा पाऊस वारंवार कोसळल्यामुळे बार्शी तालुक्यातील सर्वच गावांमध्ये कमी जास्त प्रमाणात शेतीचे नुकसान झाले. मात्र शासनाच्या ६५मिलीमीटर पावसाच्या अटीमुळे तालुक्यातील चार मंडलातील ४६ गावांना वगळण्यात आले आहे.आदी निसर्गाने आणि आता शासनानेही शेतकऱ्यांकडे पाठ फिरवल्याने त्यांना कोणच वाली उरलेला नसल्याचे चित्र आहे.
बार्शी तालुक्यामध्ये सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे आगळगाव ,उपळे दुमाला, पांगरी, पानगाव, गौडगाव आणि बार्शी या सहा मंडलामध्ये २४ तासात ६५ मिलिमीटरपेक्षा अधिक पाऊस पडल्याने शेती पिके, घरे व इतर नुकसान झाल्याचे दिसून आल्याने शासन निर्णय महसूल व वन विभाग यांच्याकडे निर्देशित केलेल्या नियमानुसार बार्शी तहसीलदारांनी संबंधित मंडलातील तलाठी, कृषी सहाय्यक आणि ग्रामसेवक यांची ग्राम पातळीवर समिती स्थापन केली आहे.
बार्शी तालुक्यामध्ये ३१ हजार ७४९ हेक्टर वरती सोयाबीनची सरासरी पेरणी केली जाते यावर्षी १५५ टक्क्यांनी वाढून ४९ हजार २७३ हेक्टर वरती विक्रमी पेरणी झाली. त्यात सुरुवातीला चक्क २८ दिवस पावसाने तोंडही दाखवले नाही. त्यामुळे उगवलेला अंकुर मरतो की काय अशी परिस्थिती झाली असताना कमी दाबाच्या पट्ट्यामुळे मुसळधार पावसाला सुरुवात झाली. आणि संजिवनी मिळाली. मात्र दिवसेंदिवस हा पाऊस इतका वाढत गेला की बार्शी तालुक्यातील १० मंडळापैकी सहा मंडळां मध्ये अतिवृष्टी झाली तर उर्वरित चार मंडलांना झोडपून काढले. वारं वार पाऊस पडत राहिल्यामुळे शेतात कसेबसे राहिलेले पिक ही कुजुन गेले.बार्शी तालुक्यातील तिन्ही मध्यम प्रकल्प भरल्याने सांडवे सुटले त्यामुळे नदीपात्रात पाण्याची वाढ झाली . शासकीय आकडेवारी नुसार सुर्डी आणि वैराग मंडलमध्ये अति मुसळधार पाऊस पडला नसला तरी थांबून थांबून संततधार पाऊस पडत राहिल्यान नदीपात्राच्या शेजारील शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. वैराग, सुर्डी, नारी ,खांडवी परिसरात जोरदार पावसाने हजेरी लावली होती वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटात पडलेल्या पावसाने काही भागाला व शहराला झोडपले. यात मात्र सोयबीन पिकाच मोठ नुकसान झाल आहे .शेतकरी मोठया संकटात सापडला असताना देखील शासनाने मात्र चार मंडळ यातून वगळे आहेत., या पाडलेल्या पाऊसामुळे काही शेतकऱ्याचे आलेले पीक गेले , त्यामुळे शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे
वगळलेली गावे :
सुर्डि, रस्तापूर ,यावली, मुंगशी वा, मालवंडी, मानेगाव, दहिटणे, तुर्कपिंपरी ,तडवळे, ढोराळे, काळेगाव ,गुंडेगाव, इर्ले, इर्लेवाडी, सासुरे, सर्जापूर ,शेळगाव आर, वैराग, लाडोळे ,राळेरास, रातंजन, मुंगशी आर ,धामणगाव दुमाला, येळंब ,ममदापूर, पिंपळगाव ,पिंपरी आर, नारिवडी, धोत्रे ,तांदुळवाडी, चिखर्डे ,गोरमाळे ,खामगाव ,कापसी, इंदापूर, नारी, हिंगणी आर ,खांडवी, बळेवाडी, भोईजे, वांगरवाडी ,शेंद्री ,श्रीपत पिंपरी ,कव्हे, नागोबाचीवाडी, कोरफळे
0 Comments