"गौरी खानचा ‘मन्नत’मधील नोकरांना खास आदेश, ‘जोपर्यंत आर्यनची सुटका होत नाही, तोपर्यंत…,”



क्रूझ ड्रग्ज प्रकरणात आर्यन खानला एनसीबीने अटक केल्यापासून बॉलिवूड स्टार शाहरुख खान अक्षरक्ष: कोलमडून गेला आहे. त्याच्या आलिशान ‘मन्नत’ बंगल्यामध्ये सध्या सन्नाटा पसरलेला आहे. शाहरुखच्या घरातील सगळेच कमालीचे टेन्शनमध्ये असल्याचे पाहायला मिळत आहे.

आर्यन खान सध्या मुंबईतील आर्थर रोड जेलमधील कैदी आहे. त्याच्या जामीन अर्जावर उद्या (ता. २०) कोर्टात सुनावणी होणार आहे. त्यात आर्यनची जामीनावर सुटका होते, की आणखी काही दिवस त्याला जेलमध्येच काढावे लागतील, याचा फैसला उद्याच होणार आहे.

सध्या सणासुदीचे दिवस असल्याने सगळीकडे उत्साहाचे, जल्लोषाचे वातावरण आहे. मात्र, ‘मन्नत’मध्ये भयाण शांतता पसरली आहे. मुलगा जेलमध्ये असल्याने सेलिब्रेशन तर दूरच, पण शाहरुख व गौरी यांची रात्रीची झोप उडालेली आहे. आर्यनच्या सुटकेसाठी नवरात्रात गौरीने नवसही केला होता.

गौरीचा नोकरांना खास आदेश
आर्यनची आई गौरीने तर घरातील सगळ्या नोकरांना खास आदेश दिला आहे. तो म्हणजे, “जोपर्यंत तुरुंगातून आर्यनची सुटका होत नाही, तोपर्यंत घरात कोणत्याही प्रकारचे गोड पदार्थ केले जाणार नाहीत..!’

‘मन्नत’मधील नोकर काही दिवसांपूर्वी घरात खीर बनवत होता. मात्र, त्यावेळी तिने त्याला खीर बनवू नकोस, असे सांगत तात्काळ त्याला थांबायला सांगितलं. तसेच यापुढे घरात कोणताही गोडधोड पदार्थ करायचा नाही, असा स्पष्ट आदेशच दिला.

व्हिडीओ कॉलवर आर्यनशी संवाद
दरम्यान, अटक झाल्यापासून जवळपास १२ दिवसांनंतर आर्यनने आई गौरी आणि पिता शाहरुखशी व्हिडीओ कॉलद्वारे संवाद साधला. आर्यनची झालेली अवस्था पाहून गौरी-शाहरुखच्या डोळ्यांतून अश्रूंच्या धारा लागल्या. काही वेळ त्यांनी बोलताही येत नव्हते.

Post a Comment

0 Comments