पुण्यात एका कबड्डीपट्टू १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर एकतर्फी प्रेमातून कोयत्याने सपासप वार करून खून केल्याची धक्कादायक घटना बिबेवाडीमध्ये घडली आहे. तीन तरुणांनी या मुलीवर कोयत्याने हल्ला चढवला होता. या घटनेमुळे पुण्यात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बिबवेवाडी परिसरातील यश लॉन्स इथं ही घटना घडली. क्षितिजा अनंत व्यवहारे (वय १४ रा, अप्पर, बिबवेवाडी) असं मृत तरुणीचं नाव आहे.
क्षितिजा नियमितपणे कब्बडीचा सराव करण्यासाठी संध्याकाळी इथं आली होती. त्याच वेळी तिथे आलेल्या तीन नराधम तरुणांनी क्षितिजावर कोयत्याने हल्ला चढवला. क्षितिजा व्यवहारेचा कोयत्याने गळा चिरून हत्या केली. घटनेनंतर तिन्ही आरोपी घटनास्थळावरून फरार झाले.
यातील एक आरोपही तिच्या नात्यातला होता, अशी माहितीसमोर आली. शहरात एकतर्फी प्रेमातून कबड्डीपटू मुलीचा खून झाल्याने शहरात प्रचंड खळबळ उडाली आहे. या प्रकरणी बिबेवाडी पोलीस स्थानकात गुन्हा दाखल झाला असून गुन्हे शाखेसह बिबवेवाडी पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत. प्रियकराने मोडलं प्रेयसीचं लग्न दरम्यान, स्वतःच लग्न झालेलं असतानाही पूर्वाश्रमीच्या प्रेयसीच्या लग्नात खोडा घातला आणि तिच्या होणाऱ्या नवऱ्याला भेटून आपल्या प्रेमसंबंधाची माहिती दिली आणि लग्न मोडण्यास भाग पाडलं.
पोलिसांनी या प्रकरणी संबंधित प्रियकराला अटक केली. पुण्यातील सिंहगड रस्ता परिसरात हा प्रकार घडला. २१ वर्षीय तरुणीची आणि आरोपी प्रशांत हगवणे यांची फेसबुकवरून ओळख झाली होती. फेसबुक वरून चॅटिंग करता करता दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले.
मागील चार वर्षापासून ते एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाले होते. दोघांनी लग्नाच्या आणाभाकाही घेतल्या. पण मुलीची जात आडवी आली आणि. प्रशांतच्या घरच्यांनी लग्न लावून देण्यास नकार दिला.त्यानंतर सहा महिन्यांपूर्वीच त्याचं नात्यातल्याच एका मुलीसोबत लग्न लावून देण्यात आलं. त्यानंतरही प्रशांत पीडित मुलीला त्रास देतच राहिला. जेव्हा तिचं लग्न ठरलं तेव्हा मात्र त्याने कहरच केला. तिच्या होणाऱ्या नवऱ्याचा भेटून तिच्याविषयी उलट-सुलट सांगितलं आणि लग्न मोडण्यास भाग पाडलं. अखेर या प्रकरणी हवेली पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
0 Comments