परंडा! इंस्टाग्रामवर मुलीच्या नावे बनावट खाते तयार करून अश्लील चॅट ; १९ वर्षीय तरुणाला पोलिसांनी आपल्या बेड्या


अंबी/प्रतिनिधी:

 इंस्टाग्रामवर मुलीच्या नावे बनावट खाते तयार करून मुलांशी अश्लील चॅट करणारे शूरवीर कमी नाहीत. उस्मानाबाद जिल्ह्यातील एका तरुणास अश्या एका प्रकरणात पोलिसांनी बेड्या  ठोकल्या आहेत. सदर तरुण रोहकल, ता. परंडा येथे येथिल दिगंबर हनुमंत कांबळे, वय १९ वर्षे हा तरुण त्याच्या वडीलांच्या व मामाच्या नावे असलेल्या दोन भ्रमणध्वनी क्रमांकाचा वापर करुन ती इंस्टाग्रामवर खाती हाताळात असल्याचे समजले. यावरुन पथकाने त्यास ताब्यात घेउन गुन्ह्यात वापरलेला भ्रमणध्वनी जप्त केला आहे. 

(Advertise)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका तरुणीच्या नावाने इंस्टाग्रामवर दोन बनावट खाती उघडून अनेक तरुणांशी अश्लील संवाद साधला जात होता. यातुन त्या मुलीची बदनामी होत असल्याने तीने अंबी पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. सायबर पोलीसांनी इंस्टाग्रामशी संपर्क साधून त्या खात्यांची माहिती घेतील असता त्या खात्यांच्या वापरकर्त्याशी संबधीत दोन भ्रणमध्वनी क्रमांक प्राप्त झाले.

परंडा पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक गिड्डे अंबी पोलीस ठाण्याचे पोलीस सहाय्यक निरीक्षक आशिष खांडेकर, यांसह पोलीस हेड कॉन्स्टेबल गजानन मुळे, पोलीस नाईक सिध्देश्वर शिंदे, पोलीस कॉन्स्टेबल सतीश राऊत यांच्या पथकाने  ही कारवाई केली आहे

Post a Comment

0 Comments