बार्शी! पत्नीसमोर शिक्षकाच्या डोक्यात मारून पहाटे तीन वाजताच्या सुमारास बंगल्यात चोरी



बार्शी/प्रतिनिधी: पहाटे ३ वाजताच्या सुमारास बंगल्यात प्रवेश करून पत्नीसमोर शिक्षकाला डोक्यात मारून चोरी केल्याचा प्रकार बार्शी तालुक्यातील चुंब येथे घडला आहे. रविवारी (ता. २४) पहाटे हा प्रकार घडला असून चोरट्यांचा शोध घेण्यासाठी पोलिस उपविभागीय अधिकारी डॉ. विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली पथक तयार करण्यात आले आहे. संजय महादेव जाधवर (वय ३६) असे यात जखमी झालेल्या सहशिक्षकाचे नाव आहे.

घरात प्रवेश केलेल्या चोरट्यांना पाहून जाधवर यांच्या पत्नीला जाग आली. तेव्हा जाधवरही जागे झाले. त्यांनी समोर असलेल्या दोघांपैकी एकाचा पाय पकडून खाली पडले. तेवढ्यात दुसऱ्यांने लाकडाने त्यांच्या डोक्यात मारले. त्यानंतर चोरट्यांनी रोख रकमेसह दागिने पळवले. जाधवर यांच्यावर बार्शी शहरात खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

जखमी जाधवर यांनी शनिवारी रात्री बंगल्याच्या एका बाजूने दरवाज्यात बाहेरून कुलूप लावले होते. मुख्य दरवाजाला आतून कुलूप लावून हे दाम्पत्य घरात झोपले. पहाटे तीन वाजण्याच्या दरम्यान त्यांची पत्नी अचानक ओरडली. त्यामुळे जाधवर जागे झाले.

त्यांच्या पायथ्याशी दोघेजण तोंडाला कापड बांधलेले दिसले. जाधवर यांनी एकाचे पाय धरुन खाली पडले. तेवढ्यात दुसऱ्याने पत्नी देखत लाकडाच्या दांडक्याने त्यांच्या डोक्यात व हातावर मारून जखमी केले. त्यानंतर चोरट्यांनी कपाट फोडून रोख पाच हजार व सोन्याचे दीड तोळ्याचे गंठण चोरून नेला.

Post a Comment

0 Comments