....आता रोहित शर्मा होणार इंडियन क्रिकेट टीमचा कॅप्टन



नवी दिल्ली : विराट कोहली भारतीय क्रिकेट संघाचे कर्णधारपद सोडणार आहे. टी -२० विश्वचषकानंतर तो कर्णधारपदावरून पायउतार होईल.ही बातमी काही दिवसांपूर्वीच समोर आली होती. पण तेव्हापासून आतापर्यंत प्रत्येक क्रिकेट चाहत्याला पडलेला प्रश्न म्हणजे नेमकं हे कर्णधारपद मिळणार कोणाला? सध्या भारताकडे टी २० संघाचं कर्णधारपद सांभाळण्यासाठी काही चांगले पर्याय आहेत. यामध्ये रोहित शर्मा, केएल राहुल आणि ऋषभ पंत हे महत्त्वाचे पर्याय आहेत. पण हे पद उपकर्णधार रोहित शर्मा याला मिळणार असल्याचं इनसाइड स्पोर्ट नावाच्या वेबसाइटने सांगितलं असून त्यांना बीसीसीआयच्या सूत्रांनी ही माहिती दिली असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे.

संबधित रिपोर्टमध्ये बीसीसीआयच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीत म्हटलं आहे की, ‘रोहित शर्मा सध्या संघातील दिग्गज खेळाडू आहे. तो उपकर्णधारही असल्याने टी २० वर्ल्ड कपनंतर तोच विराटची जागा घेईल. याबद्दलचं अधिकृत वक्तव्य हे स्पर्धेनंतरच केलं जाईल.’ विराटने वर्कलोडचं कारण देत कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला होता. त्याने आतापर्यंत तीन महत्त्वात्या आयसीसी टूर्नामेंट खेळल्या. ज्यात २०१७ चॅम्पियन्स ट्रॉफी, २०१९ वर्ल्ड कप आणि २०२१ वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप या स्पर्धा असून त्याने या तिन्हीमध्ये पराभवचं मिळवला आहे. ज्यानंतर आता त्याने हा निर्णय़ घेतला.

रोहित टी २० कर्णधारपद सांभाळण्यात यशस्वी

रोहित शर्माने आतापर्यंत जेव्हाही कर्णधारपद मिळालं आहे, तेव्हा त्याचा वापर अगदी योग्यरित्या केला आहे. त्यान आशिया कपसारख्या स्पर्धाही जिंकवून दिल्या असून टी २० कर्णधारपदाचा विचार करता आय़पीएलमधील रोहितचं प्रदर्शनचं यासाठी खूप आहे. जगातील सर्वात अवघड लीग असणाऱ्या आयपीएलमध्ये तब्बल ५ ट्रॉफी जिंकणाऱ्या मुंबई इंडियन्स संघाचा कर्णधार असणाऱ्या रोहितच्या याच कामगिरीमुळे त्याला ही जबाबदारी दिली जाणार आहे. भारतीय संघाचा विचार करता रोहितने १९ टी२०  सामन्यात भारताचं कर्णधारपद सांभाळलं असून त्यातील १५ सामन्यात विजय मिळवला आहे. कर्णधार असताना रोहितने  ४१.८८ च्या सरासरीने ७१२ रनही केले आहेत.

Post a Comment

0 Comments