सोलापूर/प्रतिनिधी:
प्रेम संबंधांमध्ये अडथळा येत असल्याने नराधम पतीने आपल्या पत्नीला बाथरूममधील लायझोल लिक्विड पासून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. घटना सैफुल भागातील उद्भव नगरात घडली याप्रकरणी पती राहुल राजाभाऊ उदार व फरीदा शेख या दोघांविरोधात विजापूर नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी स्नेहा राहुल उदार यांनी दिलेल्या फिर्यादीत, स्नेहा हिला पती राहुल व फरीदा शेख यांच्या प्रेमसंबंधाबाबत माहिती झाली असल्या कारणाने फिर्यादी ही दोघांच्या प्रेमसंबंधात अडथळा येवू शकते याचा राग मनात धरून, यातील दिनांक ३ ऑक्टोबर २०२१ रोजी राहुल याने फिर्यादीस राहते घराच्या बाथरूमध्ये जबरदस्तीने घेवून जावुन लायझोल लिक्वीड पाजुन, तू कोणास काही एक सागितले तर सोडणार नाही. तसेच दिनांक ०४ ऑक्टोबर २०२१ रोजी स्नेहा ही अश्विनी रुग्णालयात उपचारासाठी दाखल असताना फरीदा हि तिथे जाऊन स्नेहा हिला तु माझे राहुलचे नाव कोठे घेवू नको घेतली तर तुला बघुन घेते असे धमकावले आहे म्हणून १५ ऑक्टोबर २०२१ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक भोसले करीत आहेत.
0 Comments