एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांची एका वर्षात नोकरी घालवणार असं वक्तव्य केलं होतं. मंत्री नबाब मलिक यांनी केले होते, त्यावरून आता केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी नवाब मलिक यांना खोचक टोला लगावला आहे.
समीर वानखेडे यांची नोकरी जातेय की, नवाब मलिक यांचे मंत्रिपद जातेय ते पाहुया, असं म्हणत रामदास आठवले यांनी नवाब मलिक यांच्यावर निशाणा साधला आहे. आरोप होतायेत मात्र पुर्ण चौकशी केल्यानंतर आर्यन खानसह इतरांना ताब्यात घेण्यात आलं आहे, असंही आठवले म्हणाले आहेत.
न्यायालयाने आर्यन खानचा जामीन अर्ज फेटाळला आहे. याचाच अर्थ असा होतो की, आर्यन खानविरोधात एनसीबीकडे सबळ पुरावे आहेत. त्यामुळे आरोप करणे योग्य होणार नाही, असं म्हणत नवाब मलिक यांना फटकारले आहे. जी माहिती मिळतेय त्याप्रमाणे कारवाई केली जात आहे, असं रामदास आठवले यांनी सांगितलं आहे.
0 Comments