एकिकडे सचिन तेंडुलकरचा मुलगा क्रिकेट विश्वाच आपली ओळख बनवू पाहत असतानाच त्याच्या मुलीचं नाव कलाविश्वात चर्चेत येऊ लागलं आहे. सारा तेंडुलकर ही सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रिय आहे. तिच्या प्रत्येक पोस्टवर असंख्य लाईक्स असतात. असाच एक फोटो तिनं नुकताच शेअर केला. जो पाहून, एका बॉलिवूड अभिनेत्यावरही तिची भुरळ पडली.
इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आलेल्या या फोटोमध्ये सारा बाल्कनीमध्ये उभी दिसत आहे. चेहऱ्यावर असणारं स्मितहास्य तिच्या सौंदर्यात आणखी भर टाकत आहे. तिचा हा फोटो अभिनेता कार्तिक आर्यनच्याही पसंतीस पडला असून, त्यानंही हा फोटो लाईक केला आहे.
साराच्या फोटोवर आलेल्या कार्तिकच्या लाईकनं सर्वांचंच लक्ष वेधलं. इतकंच नव्हे, तर अनेक चर्चांना उधाणही आलं. आता या चर्चा नेमक्या कोणत्या वळणावर जाऊन थांबतात हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
0 Comments