परमबीर अजूनही बेपत्ताच


गोरेगाव पोलीस ठाण्यात दाखल खंडणीच्या गुन्हय़ात चौकशीसाठी हजर राहण्याबाबत गुन्हे शाखेने नोटीस बजावूनदेखील मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह आज गैरहजर राहिले. त्यामुळे गुन्हे शाखा पुढे काय पाऊल उचलणार ते पाहावे लागणार आहे.

एका ४८ वर्षीय बिल्डरने परमबीर सिंह, बडतर्फ एपीआय सचिन वाझे तसेच अन्य पोलीस अधिकाऱयांविरोधात गोरेगाव पोलीस ठाण्यात खंडणी मागितल्याची तक्रार दिली होती. त्यानुसार खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

 दरम्यान, हा गुन्हा तपासासाठी गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आल्याने गुन्हे शाखेने परमबीर सिंह यांच्या मलबार हिल येथील राहत्या घराच्या दरवाजावर नोटीस चिकटवून चौकशीसाठी १२ ऑक्टोबर रोजी कांदिवली येथील युनिट-११ च्या कार्यालयात हजर राहण्याबाबत सांगितले होते.

Post a Comment

0 Comments