वैरागसह दहा गावांचा पाणी प्रश्न सुटला आमदार राऊत यांचे हिंगणी जलपूजन वेळी प्रतिपादन


बार्शी/प्रतिनिधी;

बार्शी तालुक्यातील हिंगणी मध्यम प्रकल्प शंभर टक्के भरले असून येत्या दोन वर्षात करता वैराग सह दहा गावांचा पाणी प्रश्न मिटला असल्याचे प्रतिपादन हिंगणी जलपूजन यावेळी आमदार राजेंद्र राऊत यांनी केले.

अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान झालेले आहे, त्याच्या पंचनाम्याचे काम काम युद्धपातळीवर चालू आहे. शेतकऱ्याला जास्तीत जास्त मदत मिळवून देण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत असेही ते म्हणाले.

(Advertise)

 हिंगणी मध्यम प्रकल्पातील या प्रकल्पातील पाण्याचे पूजन आमदार राजेंद्र राऊत व सहका-यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी माजी जि. प.सदस्य संतोष दादा निंबाळकर, बाजार समितीचे उपसभापती झुंबर दादा जाधव उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments