बार्शी! साई होंडा यांच्यातर्फे मेकॅनिकल असोसिएशन करिता ट्रेनिंग कार्यक्रमाचे आयोजन



बार्शी/प्रतिनिधी:

बार्शीतील साई होंडा यांच्यातर्फे मेकॅनिकल असोशियन करता बीएस ६ ट्रेनिंग या कार्यक्रमाचे आयोजन साई होंडाचे मालक युवराज कादे यांनी केले होते. आधुनिक काळामध्ये BS 6 आल्यामुळे त्यांची सर्वाना माहिती ह्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

हिरो कंपनीचे मंदार सर म्हणाले की, बी एस 6 ही नवीन टेक्नॉलॉजी आल्यामुळे जे प्रश्न आहेत ते निश्चितपणे दूर करण्यासाठी हे ट्रेनिंग उपयुक्त आहे, बी एस 6 तंत्रज्ञानामुळे मुळे प्रदुषणाला ही निश्चितच आळा बसेल असे प्रतिपादन त्यांनी बोलताना केले. श्री गुरुदेव यांनी बी एस ६ या नवीन टेक्नॉलॉजीमुळे मेकॅनिकलला येणाऱ्या अडचणी सोडवाव्या नवीन टेक्नोलॉजी च्या गाडीचे दुरुस्ती व अन्य प्रश्नासंदर्भात त्यांनी उपस्थितांशी संवाद साधला. मेकॅनिकल असोसिएशनचे अध्यक्ष विजय कोरे बोलताना म्हणाले, कोणतीही गाडी घेताना कस्टमर वर्कशॉप आँनर मेकॅनिक चा सल्ला घेतात, त्यामुळे कंपन्यांनी मेकॅनिक बंधूंना वेळोवेळी ट्रेनिंग उपलब्ध करून द्यावे.

या कार्यक्रमाला मेकॅनिकल असोसिएशनचे अध्यक्ष विजय कोरे, उपाध्यक्ष उमेश पिंपळे, खजिनदार संतोष दसंगे, खजिनदार रवी कुलकर्णी, संस्थापक अध्यक्ष शैलेश माने सिनियर मेकॅनिक जयपाल ठाकूर, कपिल व्यवहारे, कार्याध्यक्ष श्री गुरुदेव तसेच बार्शीतील सर्व वर्कशॉप मेकॅनिकल ऑनर नी सहभाग घेतला. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी भावेश बोकेफोडे, चैतन जगदाळे, नवनाथ कादे, प्रसाद क्षिरसागर, अजय चांदणे यांनी परिश्रम घेतले.

Post a Comment

0 Comments