बार्शी तालुका पोलीस स्टेशन ची दमदार कामगिरी; नऊ गुन्ह्यातील २४ लाखाचा मुद्देमाल जप्त



बार्शी/प्रतिनिधी:

बार्शी तालुका पोलीस हद्दीत वाढत्या चोर्‍या व घटनांमुळे पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी सदर गुन्हे उघडकीस आणण्याच्या सूचना दिल्या होत्या, त्या अनुषंगाने सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी जायपत्रे, पोलीस नाईक अभय उंद्रे, अमोल माने, धनराज फत्तेपुर यांच्या विशेष टीमने ही कामगिरी केली.

पोलिसांना मिळालेल्या गुप्त बातमीद्वारे पटाईत आरोपी माणिक गुलाब काळे (३०) रा. कासारखानी ता.वाशी जि. उस्मानाबाद यांच्यावर वॉच ठेवून सदर आरोपी हा वाशी गावच्या बाजारपेठेत ता. वाशी ते खरेदी विक्री करण्यासाठी येणार होता अशी गोपनीय माहिती मिळाली सदर आरोपी ची विश्वासात घेऊन तपास केला, असता तीन साथीदाराच्या मदतीने बार्शी तालुका पोलीस ठाणे कडील ९ गुन्हे केल्याचे कबूल केले.

या गुन्ह्यामध्ये चोरी केलेला महाल मोबाईल टावरच्या बॅटऱ्या, इलेक्ट्रिक पोलवरील तारा, पेरणी यंत्र, दहा टायर टिप्पर असा २४,८०८४ रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. 

सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक तेजस्विनी सातपुते, अप्पर पोलीस अधीक्षक किंमत जाधव, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील, बार्शी उपविभागीय पोलिस अधिकारी अभिजित धाराशिवकर यांच्या मार्गदर्शनाखाली बार्शी तालुका पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक शिवाजी जायपत्रे यांच्या नेतृत्वाखाली ही कामगिरी केली आहे.

Post a Comment

0 Comments