बार्शी! महाराष्ट्र विद्यालयात वाचन प्रेरणा दिन साजरा


बार्शी/प्रतिनिधी:

दिनांक १५/१०/२०२१ वार शुक्रवार रोजी  डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांची आज जयंती वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरी करण्यात येते या दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र विद्यालय बार्शी या ठिकाणी वाचन प्रेरणा दिन उत्साहात साजरा करण्यात आला. 

प्रथम कर्मवीर डॉ.मामासाहेब जगदाळे व डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेचे पूजन विद्यालयाचे प्राचार्य जी.ए.चव्हाण व विद्यालयाचे ग्रंथपाल श्री मनोज मिरगणे यांच्या हस्ते संपन्न झाले. सोबत किमान कौशल्य विभागाचे प्रमुख प्रा.श्रीपाद भंडारी, प्रा. किरण गाढवे, मुख्य लिपिक रमेश चौर ,श्री परसराम काळे, श्रीनिवास पाटील ,सर्व शिक्षक व  शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. 

या कार्यक्रमात पुढे मानसी काळे, श्रवण पाटील व संग्राम मोरे  या विद्यार्थ्यांनी आपली मनोगते व्यक्त केली. तसेच शिक्षकांमधून प्रा. श्रीपाद भंडारी व प्रा. किरण गाढवे यांनी आपली मनोगते व्यक्त केली तसेच विद्यालयाचे प्राचार्य व या कार्यक्रमाचे अध्यक्ष जी.ए.चव्हाण यांनी अध्यक्ष समारोप केला.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन श्री आनंद कसबे यांनी केले.

Post a Comment

0 Comments