एकनाथ खडसे यांनी भाजप नेते गिरीश महाजन यांच्यावर नाव न घेता निशाणा साधला आहे. गिरीश महाजन यांचे वडील शिक्षक होत. त्यावरून एकनाथ खडसे यांनी ज्यांचे वडील मास्तर होते त्यांनी हजार बाराशे कोटींची संपत्ती कशी जमवली?, असा सवाल करत गिरीश महाजन यांना लक्ष्य केलं आहे.
‘मला ईडी लावली तर मी सीडी लावेल’, एकनाथ खडसे यांचं हे वक्तव्य चांगलचं चर्चेत होतं. त्यानंतर ईडीने एकनाथ खडसे यांच्यावर कारवाई केली होती. आता ईडीचा काहीही संबंध राहिला नाही, असं एकनाथ खडसे यांनी स्पष्ट केलं आहे. एकनाथ खडसेंनी जळगाव जिल्ह्यातील बोदवड येथे कार्यकर्त्यांशी संवाद साधला.
0 Comments