करमाळा/प्रतिनिधी:
तालुक्यातील निमगाव (ह) येथील पाण्याची टी पॉइंट व शेड उभारून अडविलेला रस्ता खुला व्हावा म्हणून स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने हलगी नाद आंदोलन करणार आहे. असे निवेदन दिले आहे ते निव्वळ प्रशासकीय अधिकारी व इतर लोकांना वेठीस धरण्यासाठीच आहे. त्यामुळे मारुती नीळ यांनी खोटी विधाने देऊन केलेली मागणी फेटाळून लावावी असा लेखी अर्ज तहसीलदार साहेब करमाळा यांचे कडे जगन्नाथ शिंदे यांनी दिलेला आहे. श्री.शिंदे यांनी याबाबत तहसीलदार करमाळा यांना दि.१/१०/२०२१ रोजी लेखी अर्ज सादर केला आहे.त्यात त्यांनी म्हंटले आहे की, स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नावाचा गैर वापर करून मारुती नीळ वैगरे लोकांनी गट नं.६९ मधील रस्त्यांवर पाण्याची टी पॉइंट व शेड उभारून अडविला आहे तो खुला व्हावा म्हणून मागणी केली आहे, ती निव्वळ प्रशासनास वेठीस धरून दिशाभूल करणारी आहे.
मारुती नीळ वैगरे लोक हे मुद्दाम प्रशासनाची दिशाभूल करत आहेत. ज्या ठिकाणी कधीच रस्ता नाही व नव्हता असे असतांनाही स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे एक कार्यकर्ते हे मारुती नीळ वैगरे लोक यांचे जवळचे नातलग असल्यामुळे शेतकरी संघटनेचे नावाचा गैर वापर करून वैयक्तिक स्वार्थासाठी संघटनेचे नाव घेऊन तथाकथित कहाणी रचून ज्या ठिकाणी कधीच रस्ता नव्हता व नाही तो रस्ता खुला व्हावा म्हणून मागणी करत आहेत.अशी चुकीची व बेकायदेशीर मागणी करून, प्रशासनावर दबाव आणून सतीश नीळ व अंकुश नीळ यांना व इतर लोकांना मुद्दाम त्रास देण्याच्याच मुख्य उद्देशाने संघटनेचे काही पदाधिकारी हे वैयक्तिक स्वार्था साठी व जवळचे पाहुणे आहेत म्हणूनच प्रशासनास वेठीस धरत आहेत. व संघटनेच्या नावाखाली आंदोलन करण्यात येत आहे. हे योग्य नाही. माझे वडील स्व.व्यंकट लिंबा शिंदे यांनी दि.१६/०१/२००१ साली आमचे गावचे पुनर्वसन झाले मुळे अरुण रामराव नीळ यांचे कडून जमीन गट नं.६९ पैकी मधील २ गुंठे जमीन हि विकत घेतली आहे. तिची हद्दी खूण हि जमीन गट नंबर ७० च्या हद्दी पर्यंत आहे. त्यामुळे आमचे वडील स्व. व्यकंट शिंदे यांनी घराचे बांधकाम हे आमच्या स्वतः च्या व जमीन गट नं.७० च्या बांधावर केलेले आहे. त्यामुळे गट नं. ६९ मध्ये रस्ता आहे असे म्हणणे म्हणजे निव्वळ खोट्या वल्गना करून प्रशासनास वेठीस धरण्याचे फाजील काम आहे. तसेच मारुती नीळ वैगरे लोकांची खोटी माहिती ऐकून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे काही लोक म्हणतात की रस्त्यांवर पाण्याची टी पॉइंट व पत्र्याचे शेड उभारून रस्ता अडविला आहे ते म्हणणे चुकीचे असून जमीन गट नं.७० चे मालक सतीश नीळ, अंकुश नीळ यांनी त्यांच्याच हद्दीत पाण्याची टी पॉइंट व पत्र्याचे घर केलेले आहे. त्यामुळे या ठिकाणी रस्ता नाही.व नव्हता. त्यामुळे तो खुला करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. याउलट मारुती विनायक नीळ व भाऊसाहेब नीळ हे खोटी माहिती देऊन, दिशाभूल करून फसवणूक करीत आहेत. मारुती नीळ वैगरे लोक हे मा. उपविभागीय अधिकारी साहेब माढा विभाग कुर्डुवाडी यांचे कार्यालया समोर उपोषणास बसले होते त्यावेळी उपविभागीय अधिकारी यांची चक्क खोटी माहिती देऊन दिशाभूल केली आहे.
वास्तविक सत्य परिस्थिती पाहता मारुती नीळ वैगरे लोक यांनी केलेली मागणी म्हणजे जाणीवपूर्वक इतर लोकांना त्रास देण्याच्या आकस बुद्धीने व इतर लोकांना वेठीस धरून विनाकारण अधिकारी यांची दिशाभूल करणारी मागणी आहे. जमीन गट नं.६९ मध्ये या पूर्वीही व आजही रस्ता नाही व नव्हता. याशिवाय या जमिनीचे मुळ मालक अरुण रामराव नीळ यांनी विजय दिगंबर नीळ यांना गट नं.६९ पैकी मधील एक एकर जमीन विक्री केली आहे त्यामध्येही कुठेच रस्त्याचा उल्लेख नाही. तसेच सतीश नीळ, अंकुश नीळ यांनी त्यांच्याच हद्दीत पत्र्याचे घर उभारले आहे, त्यांच्याच हद्दीत शेतीच्या पाण्याची टी पॉइंट केलेला आहे. याशिवाय आमचे वडील स्व. व्यंकट लिंबा शिंदे यांनी मागील २० वर्षा पूर्वी जमीन गट नं. ६९ मध्ये पूर्वेस व गौडरे रस्त्याच्या बाजूला म्हणजेच गट नं.६९ च्या उत्तर बाजूला असणारी जमीन गट नं. ७० या (सतीश नीळ व अंकुश नीळ) यांच्या तालीवर पक्के घर बांधकाम केलेले आहे. त्यामुळे तिथे रस्ता नाही. मारुती नीळ यांनी केलेली खोटी तक्रार इतर लोकांना विनाकारण त्रास देण्याच्या आकसा पोटी , सुडबुद्धीने, व राजकीय उद्देशाने केलेली आहे. याशिवाय आपण यापूर्वीही समक्ष स्थळ पाहणी केली आहे, त्यानंतर मंडल अधिकारी यांनी ही समक्ष स्थळ पाहणी केली आहे. त्यावेळीही सदरील ठिकाणी रस्ता नाही असा अहवाल मंडल अधिकारी सालसे यांनी आपणास सादर केलेला आहे.व आपणही शेजारील लोकांचे जबाब नोंदवून घेतलेले होते त्यावेळी हि लोकांनी या ठिकाणी कधीच रस्ता नाही असे सांगितले आहे.
तरी आपण मारुती नीळ वैगरे लोकांनी केलेली मागणी हि बिनबुडाची व निव्वळ खोटी व कथा रचून सादर केली आहे. ती फेटाळून लावण्यात यावी असेही विनंती केली व श्री शिंदे यांनी अर्जात शेवटी म्हटले आहे की, मी आपले खास करून लक्ष वेधू इच्छितो की, मारुती नीळ वैगरे लोकांच्या पाटील वस्तीस, व त्यांच्याच जमीन गट ७९ अ.व ब पैकी शेती साठी गाव नकाशात दाखवल्याप्रमाणे सरकारी रस्ता आहे तोच रस्ता याच मारुती नीळ वैगरे लोक यांनी अतिक्रमण करून अडविला आहे. तो तात्काळ खुला होऊन मिळावा अशी मागणी तत्कालीन सरपंच श्रीमती शकुंतला मधुकर नीळ यांनी मागणी केली होती त्यावरून मंडल अधिकारी सालसे यांनी अनेक वेळा नोटीस बजावून ही मारुती नीळ वैगरे लोकांनी वारंवार तारीख पे तारीख मागणी करून मुद्दाम चालढकल केली आहे. सदरील गाव नकाशात दाखवल्याप्रमाणे रस्ता खुला व्हावा म्हणून गेल्या वर्षी पासून ही केस पेंडींग आहे. त्याचीच चौकशी तात्काळ पूर्ण होऊन तो रस्ता तात्काळ खुला व्हावा यासाठी आपण आपल्या स्तरावरून सर्व सबंधित अधिकारी व अतिक्रमण केले आहे त्या सर्व शेतकऱ्यांना अतिक्रमण काढणे बाबत आदेश द्यावेत हि आदरपूर्वक नम्र विनंती. याबरोबरच श्री. शिंदे यांनी अर्जा सोबत जमीन गट नं.६९ मधील आमचे वडील स्व.व्यंकट लिंबा शिंदे यांनी विकत घेतलेल्या जमीनीची कागदपत्रे, पाटील वस्तीकडे जाणाऱ्या रस्त्या बाबत चा भूमीअभिलेख करमाळा यांचे कडील अहवालाची झेरॉक्स प्रत जोडली आहे.
0 Comments