बार्शी/प्रतिनिधी:
गुळपोळी व मालवंडी शेतातील रात्रीचे सिंगल फेज लाईट चालू करा अन्यथा सुर्डी,अथवा बार्शी च्या एम एस ई बी ऑफिस समोर धरणे आदोलन करणयात येईल, भैरवनाथ शेतकरी व शेतमजूर संटना पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सूर्यकांत गोविंद चिकणे व प्रविन तुकाराम डोके व रेखा सूर्यकांत चिकणे यांनी सदरचे निवेदन तहसीलदार सुनिल शेरखाने यांना समक्ष भेटून निवेदन दिले, व अभियंता एम एस ई बी भाग्यवंता यांना निवेदन दिले.
सदर निवेदनाची दखल घेऊन अभियंता महावितरण व जूनियर इंजीनियर उके यांनी बिघाड झालेला सिंगल फेज लाईट चालू केली गेली. मार्च महीने पासून सिंगल फेज लाईट शेतातील बंद होती ती चालू केली, गुळपोळी व मालवंडी शेतातील रात्री चे सिंगल फेज लाईट चालू केली गेली आहे, मालवंडी व गुळपोळी येथील शेतात राहणारे शेतकरी यांना दिलासा मिळाला आहे.
0 Comments