समीर वानखेडे कायदेशीर हिंदूच: अभिनेत्री क्रांती रेडकर



आय पी एस अधिकारी समीर वानखेडे निकाहनाम्याचे पेपर सासूबाईंनी बनवले होते, ज्या मुस्लीम होत्या. मात्र, माझा नवरा (समीर वानखेडे) आणि सासऱ्यांशी त्याचा काहीही संबंध नाही. समीर वानखेडे कायदेशीरदृष्ट्या आताही आणि तेव्हाही हिंदू होते, असा दावा त्यांच्या पत्नी क्रांती रेडकर यांनी केला.

त्या म्हणाल्या, समीर वानखेडे यांच्या जात प्रमाणपत्रावर हिंदू धर्म आणि जात महार असल्याचा उल्लेख आहे. स्पेशल मॅरेज अॅक्ट अंतर्गत त्यांचे लग्न झाले. त्याचे कागदपत्र आमच्याकडे आहेत, आम्ही ते दाखवू शकतो, असेही त्यांनी सांगितले. 

नवाब मलिक यांनी एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडेंवर केलेल्या आरोपांनंतर त्यांच्या वडिलांनी समोर येऊन याबाबत प्रतिक्रिया दिली. मी जन्मजात हिंदू असल्याचे त्यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले आहे. माझे पणजोबा सर्व दलित हिंदू होते. मग माझा मुलगा कुठे मुस्लिम झाला? असा सवालही त्यांनी उपस्थित केला. नवाब मलिक यांनी काहीही बोलण्यापूर्वी विचार करायला हवा, असे त्यांनी समीर वानखेडेंच्या वडिलांनी म्हटले आहे.

Post a Comment

0 Comments