सोलापूर! आईला बघून केली चेष्टा, विचारला जाब, दोन गटात हाणामारी


माझ्या आईला बघून चेष्टा का केला अशी विचारणा केल्यावर ६ जणांनी मिळून एका तरूणाला बेदम मारहाण करून जखमी केले. तर तू आमच्यावर संशय का घेतो असे विचारल्याने तरूणासह त्याच्या आई वडीलांनी मारहाण केले. अशा परस्परविरोधी तक्रारी पोलीसांकडे दाखल झाल्या आहेत.

धीरज परमेश्वर रणखांबे (वय १९ रा. गुजरवस्ती दयानंद कॉलेज जवळ सोलापूर) याने दिलेल्या फिर्यादीवरून मिळालेली माहिती अशी की, हा शेळगी रस्त्यावरील जागृत हनुमान मंदिराजवळ त्याच्या मोबाईलवर गेम खेळत बसला असताना जवळच थांबलेले अरूण लोखंडे , जीवन सोनवणे, निलेश कुमार, पिनू सोनवणे, महेश कुमार गजधाने, शुभम अरूण रणखांबे (सर्व रा. गुजरवस्ती दयानंद कॉलेज जवळ सोलापूर) या सर्वजणांनी मिळून धीरज शिंगे याची आई मेडिकलला औषधे घेण्यासाठी जात असताना चेष्टा केली. त्यावरून त्यांना तुम्ही माझ्या आईची चेष्टा का करता असे विचारल्यावरून आरोपींनी मिळून हाताने लाथाबु्नयाने मारहाण करून जखमी केले त्याचवेळी आई वडील हे मध्ये पडून समजावण्याचा प्रयत्न केला तर त्यांनाही मारहाण केली अशी फिर्याद जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात दाखल झाली त्याचा तपास पोलीस नाईक मनोहर करीत आहेत.

Post a Comment

0 Comments