...पुराव्याशिवाय कोणालाही अटक केली जाणार नाही : योगी आदित्यनाथ



 गेल्या अनेक दिवसांपासून उत्तर प्रदेशमधील लखीमपूर जिल्ह्यात घडलेल्या घटनेवरून मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि भाजपवर विरोधकांकडून निशाणा साधण्यात येत आहे.  कोणत्याही दबावाखाली येऊन कोणतीही कारवाई केली जाणार नाही. पुराव्याशिवाय कोणालाही अटक केली जाणार नाही, असं मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी स्पष्ट केलं आहे.

विरोधकांना लखीमपूर घटनेतील पीडितांच्या कुटुंबीयांची भेट घेऊ न दिल्याबाबत बोलताना योगी आदित्यनाथ म्हणाले की, विरोधकांमध्ये असलेले मित्र सद्भावना दूत म्हणून तेथे जात नव्हते. त्यातील अनेक जण या हिंसाचारात सामील असल्याचा संशय होता. या घटनेतील तथ्य समोर आल्यावर चित्र स्पष्ट होईल. आम्ही दूध का दूध आणि पानी का पानी केल्याशिवाय राहणार नाही, असं, योगी आदित्यनाथ म्हणालेत.

Post a Comment

0 Comments