पांगरी/प्रतिनिधी:
बार्शी तालुक्यातील कारी गावात मध्ये बेकायदा गावठी दारूची विक्री करणाऱ्या एका महिलेकडून १ ऑक्टोबर रोजी सकाळी साडेआठ दरम्यान उग्र व आंबट वासाची २२ लिटर दारू जप्त करून नष्ट केली, तिची अंदाजे किंमत ६६० रुपये आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पांगरी पोलिस पेट्रोलिंग करत असताना सहाय्यक पोलीस निरीक्षक सुधीर तोरडमल यांच्या नेतृत्वाखाली ही कामगिरी केली आहे. गुप्त बातमीदार मार्फत पांगरी पोलिसांना माहिती मिळाली, त्यानुसार गावाच्या बाहेर बेकायदा कुठलाही परवाना नसताना शरीरासाठी अपायकारक असणारे आंबट उग्र वासाची गावठी दारू विकताना महिला आढळून आली. गावातील पंचांसमक्ष रेखा भानुदास खंडागळे (वय ४१) वर्ष रा. कारी ता. व जि. उस्मानाबाद यांना पांगरी पोलिसांनी ताब्यात घेऊन महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम ६५ (ई) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
0 Comments