सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, विठूचा गजर हरीनामाचा…


आज आश्विन शुद्ध प्रतिपदा. नवरात्रोत्सवाला आजपासून आरंभ होत आहे. घटस्थापनेच्या मुहूर्तावर विठ्ठल रुक्मिणी मातेचे मुखदर्शन भाविकांसाठी खुले करण्यात आले आहे. दररोज दहा हजार भाविकांना पांडुरंगाच्या दर्शनाचा लाभ मिळणार आहे. शारदीय नवरात्र उत्सव प्रारंभानिमित्त विठ्ठल-रुक्मिणी मातेच्या गाभाऱ्यात आणि मंदिरात लक्षावधी तुळशीच्या पानाची आरास करण्यात आली आहे. पुण्यातील विठ्ठल भक्त राम जांभुळकर यांनी सुमारे अडीच टन तुळशी पाना फुलांचा वापर  केला आहे. तुळशीच्या पाना फुलांचा मंदिरात सुगंध दरवळत होता.


राज्यभरात नवरात्र उत्सव साजरा होत आहे. नवरात्रोत्सवा निमित्त श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे द्वार तब्बल सहा महिन्यानंतर भाविकांसाठी खुले होणार आहे. त्यामुळे विठ्ठल मंदिर समितीकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे. कोरोना पार्श्वभूमीवर राज्य सरकारने आखून दिलेल्या नियमांचे पालन करून भाविकांना पांडुरंगाचे दर्शन दिली जाणार आहे. पंढरपुरातील विठ्ठल मंदिर परिसरातील व्यापाऱ्यांनी पांडुरंगाचे मंदिर खुले होणार जोरदार तयारी केली आहे. 


आजच्या पहिल्या दिवशी विठ्ठल रुक्मिणी मुखदर्शन दिले जाणार आहे. विठुराया तुळशी पानांच्या मध्ये उभा असल्याचा भास पाहावयास मिळत होता तर मंदिरात विठ्ठल गाभारा,प्रवेश द्वार, सभा मंडप, सोळखांबी या ठिकाणी तुळशीच्या फुलांची आकर्षक अशी सजावट केली आहे. तुळशीच्या लक्षावधी पानांची आरास मंदिरात दिसत आहे. त्याचबरोबर गुलाबाच्या लाल फुलांनी ठिकठिकाणी सजावट करण्यात आली होती.  मंदिरातील ही आरास मन प्रसन्न करते हे नक्की.

Post a Comment

0 Comments