करमाळा/प्रतिनिधी:
करमाळा तालुक्यातील निमगाव (ह) येथील तथाकथित रस्त्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे हलगी नाद आंदोलन हे निव्वळ प्रशासनास व इतर लोकांना वेठीस धरण्यासाठीच जगन्नाथ शिंदे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.
पुढे बोलताना शेतकरी शिंदे म्हणाले की, मी याबाबत तहसीलदार करमाळा यांना दि.१ऑक्टोंबर रोजी लेखी अर्ज सर्व कागदपत्रा सह सादर केला आहे, मारुती नीळ हा स्वा. शे. संघटनेच्या नावाचा गैर वापर करून गट नं.६९ मधील रस्त्यांवर पाण्याची टी पॉइंट व शेड उभारून अडविला आहे तो खुला व्हावा म्हणून मागणी करत आहे. ती निव्वळ प्रशासनास वेठीस धरून व संघटनेचे काही पुढारी जवळचे पाहुणे आहेत म्हणूनच आंदोलन करण्यात येणार आहे असे समजले आहे.
याकडे मा. खा. राजू शेट्टी साहेब व वरिष्ठ पदाधिकारी यांनी वेळीच लक्ष घालून आवर घातला पाहिजे. आम्हीही शेतकरी बांधव आहेत. ज्या ठिकाणी कधीच रस्ता नाही व नव्हता असे असतांनाही तथाकथित कहाणी रचून,चुकीची व बेकायदेशीर मागणी करून, प्रशासनावर दबाव आणून आम्हा गरीब लोकांना मुद्दाम त्रास देण्याच्याच मुख्य उद्देशाने संघटनेचे काही पदाधिकारी हे काम करत आहेत.माझे वडील यांनी जमीन ग.नं.६९ मधील २ गुंठे जमीन विकत घेतली आहे. तिची हद्दी खूण हि जमीन ग.नं. ७० च्या हद्दी पर्यंत आहे. त्यामुळे आम्ही घराचे बांधकाम स्वतः च्या व जमीन ग.नं.७० च्या बांधावर केलेले आहे. त्यामुळे ग.नं.७० चे मालक यांनी त्यांच्याच हद्दीत पाण्याची टी पॉइंट व पत्र्याचे घर उभारलेले आहे. त्यामुळे गट नं.६९ मध्ये रस्ता आहे असे म्हणणे म्हणजे निव्वळ खोट्या वल्गना करून प्रशासनाची दिशाभूल व फसवणूक करणारी आहे.त्यामुळे तो खुला करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.
याउलट वास्तविक सत्य परिस्थिती पाहता मारुती नीळ व इतर लोक हे आकस बुद्धीने व प्रशासकीय अधिकारी यांची दिशाभूल करत आहेत. त्यामुळे त्यांची मागणी फेटाळून लावण्यात यावी अशी विनंती केली आहे.शेवटी म्हटले आहे की, मारुती नीळ वैगरे लोकांच्या पाटील वस्तीस, व त्यांच्याच जमीन गट ७९ अ.व ब पैकी शेती साठी सरकारी रस्ता आहे तोच रस्ता याच मारुती नीळ वैगरे लोक यांनी अतिक्रमण करून अडविला आहे. तो तात्काळ खुला होऊन मिळावा. अन्यथा आम्ही पण मारुती नीळ वैगरे लोक प्रशासनाची दिशाभूल, फसवणूक करत आहेत म्हणून कायदेशीर गुन्हा दाखल करावा म्हणून आंदोलने सुरू करू असा इशारा दिला आहे.
0 Comments