गौडगाव ता. बार्शी येथील ग्रामपंचायतीस, लायन्स क्लब बार्शी रॉयल व आयुष व्यसनमुक्ती केंद्र बार्शी यांच्यावतीने व्यसनमुक्ती ग्राम अभियान या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
उपविभागीय पोलिस अधिकारी विशाल हिरे, नगरसेवक विजय (नाना) राऊत, प्रांतपाल सुनील सुतार, बार्शी लायन्स क्लब रॉयल चे अध्यक्ष गणेश भंडारी आणि डॉ. संदीप तांबारे यांच्या उपस्थितीमध्ये गौडगाव ग्रामपंचायतीस व्यसनमुक्ती ग्रामअभियान हा पुरस्कार देण्यात आला. बक्षिसाच्या स्वरूपात ट्रॉफी, प्रमाणपत्र, रोख स्वरूपात २३ हजार रुपयाचे बक्षीस आणि गावविकासासाठी ८ लाख रुपयांचा निधी.
यावेळी सरपंच स्वाती पैकेकर, उपसरपंच उमा शिंदे, राहुल भड, हिराचंद शिंदे, नागेश काजळे, सुशांत सुरवसे, बालाजी पैकेकर, साधना भड, मैनाबाई अरगडे आदी उपस्थित होते.
0 Comments