आंतरराष्ट्रीय स्तरावरील एका महिला खेळाडूवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पीडित महिला खेळाडूवर लैंगिक अत्याचार करणारा आरोपी दुसरा तिसरा कोणी नसून भारतीय जनता पक्षाचा एका बडा नेता आहे.
याप्रकरणी पीडित तरुणीने पोलिसांत तक्रार दिल्यानंतर आरोपी भाजप नेत्याला बेड्या ठोकण्यात आल्या आहे. पीडित महिलेनं लावलेल्या आरोपात तथ्य असल्याची प्राथमिक तपासात स्पष्ट झालं आहे, अशी माहिती तपास अधिकाऱ्यांनी दिली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहे.
संबंधित घटना झारखंड राज्यातील पश्चिमी सिंहभूम येथील आहे. तर संजय मिश्रा असं अटक केलेल्या आरोपीचं नाव असून ते भारतीय जनता पार्टीच्या पश्चिमी सिंहभूम मीडिया प्रभारी आहेत.
याबाबत माहिती देताना चक्रधरपूरचे डीएसपी दिलीप खलको यांनी मंगळवारी सांगितलं, आरोपी आणि पीडित महिलेची वेगवेगळी चौकशी केल्यानंतर, आरोपी संजय मिश्राला अटक करण्यात आली आहे. डीएसपी दिलीप खलको यांनी सांगितलं की, पीडित तरुणीने लावलेल्या आरोपात तथ्य असल्याचं प्राथमिक तपासात समोर आलं आहे.
0 Comments