भाजपला एकामागोमाग एक झटका बसत आहे. आता बुलडाणा जिल्ह्यात भाजपला मोठं खिंडार पडल्याचं वृत्त समोर येत आहे. उल्हासनगरमध्ये टीम ओमी कलानीतील 22 नगरसेवक हे राष्ट्रवादी काँग्रेसचं घड्याळ आपल्या हाती बांधणार असल्याचं वृत्त समोर आलं. ओमी कलानी यांनी घेतलेल्या या निर्णयामुळे भाजपला मोठा झटका बसला आहे. आता बुलडाणामध्येही भाजपला झटक बसला आहे.
बुलडाणामध्ये चिखली नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा प्रिया बोंद्रे आजशेकडो कार्यकर्त्यांसह काँग्रेस पक्षात प्रवेश करणार आहेत. एक जिल्हा परिषद सदस्य, नगर परिषद पाणि पुरवठा सभापतींसह काही पंचायत समिती सदस्य आणि शेकडो भाजपचे कार्यकर्ते करणार आज काँग्रेसमध्ये प्रवेश करतील. काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश होणार असल्याचं समजतंय.
टीम ओमी कलानीतील 22 नगरसेवक हे राष्ट्रवादी काँग्रेसचं घड्याळ आपल्या हाती बांधणार आहेत. ओमी कलानी यांनी घेतलेल्या या निर्णयामुळे भाजपला मोठा झटका बसला आहे.
जाणून घ्या कढीपत्त्याच्या चहाची कृती, आरोग्य फायदे
कारागृहात असलेले पप्पू कलानी पेरोलवर बाहेर आले आहेत. कारागृहातून पप्पू कलानी बाहेर येताच राजकीय गाठीभेटी सुरू झाल्या आहेत. नुकतीच राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी उल्हासनगरात जाऊन पप्पू कलानी यांची भेट घेतली होती. त्यानंतर आता टीम ओमी कलानीतील 22 नगरसेवक हे राष्ट्रवादीत सहभागी होत आहेत. मात्र, भाजपने हा दावा फेटाळून लावत हे नगरसेवक राष्ट्रवादीत प्रवेश करणार नसल्याचं म्हटलं आहे.
गेल्या तीन वर्षांपासून ओमी कलानीने भाजपसोबत आघाडी करत घरोबा केला होता. नंतर शिवसेनेसोबतही जवळीक झाली. मात्र, गेल्या काही दिवसांपासून दोन्ही पक्षांपासून ओमी कलानी हे दूर झाले आहेत. भारतीय जनता पक्षाला जिल्हा बँक निवडणुकीत एक मोठा झटका बसला आहे. लातूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत भाजपच्या सर्वच्या सर्व उमेदवारांचे अर्ज बाद झाले आहेत. यामुळे निवडणुकीपूर्वीच भाजपचे उमेदवार पराभूत झाले आहेत. भाजप उमेदवारांचे अर्ज बाद झाल्याने काँग्रेसला याचा मोठा फायदा होणार असल्याचं स्पष्ट आहे.
0 Comments