'चेंज मी फिटनेस' सेंटरची वॉर वॉरियर 2021 स्पर्धा संपन्न


कोल्हापूर / प्रतिनिधी : व्यायामाचे महत्त्व वाढावे तसेच व्यायामाच्या स्पर्धेतून नवी प्रेरणा मिळावी यासाठी चेंज मी फिटनेस सेंटर तर्फे चेंज मी वॉर वॉरियर स्पर्धा 2021 पार पडली. सेंटर मधील विविध व्यायामपट्टूंनी या स्पर्धेत सहभाग नोंदवला. वेगवेगळ्या व्यायाम प्रकारात भाग घेत आपले फिटनेस कौशल्य दाखवली.

या स्पर्धेत विजेते ठरलेल्या स्पर्धकांना ट्रॉफी, मेडल देवून गौरवण्यात आले. स्पर्धेचे बक्षीस वितरण समारंभ कोल्हापूर मनपाचे माजी स्थायी समिती सभापती  शारंगधर देशमुख व हिंदकेसरी दीनानाथसिंह त्यांच्या हस्ते पार पडला. कार्यक्रमास प्रमुख पाहूणे म्हणुन राहुल पाटील (RP), पत्रकार मतीन शेख, प्राचार्य किरण पाटील उपस्थित होते. तसेच चेंज मी फिटनेस सेंटरचे अभय सिंह, किरण पाटील (KP) राहुल जाधव, प्रसन्न काटवे, डॉ.अशोक रणदिवे.  डॉ.कुमार ननावरे, डॉ.रमेश कुर्ले, इंद्रजित जाधव, विकास जाधव, धवल पोवार, डॉ. पल्लवी मोटे डॉ.स्वाती पाटील, अमर गोंधळी, रोहित बोबाटे, श्रद्धा माने यांची उपस्थिती होती. ही स्पर्धा यशस्वी करण्यार फिटनेस सेंटरच्या सर्व सदस्यांनी सहकार्य केले.

Post a Comment

0 Comments