१५ वर्षीय मुलीचे न्यूड फोटो काढून ते व्हायरल करण्याच्या धमकीने तिच्यावर वारंवार बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. बुलडाणा जिल्ह्यातील मलकापूर शहरामध्ये अल्पवयीन मुलीसोबत हा प्रकार घडला. पीडितेच्या तक्रारीनंतर आरोपी नराधम आणि त्याला मदत करणाऱ्या दोन मुलींना पोलिसांनी अटक केली आहे.
बुलडाणा जिल्ह्यातील मलकापूर शहरामध्ये राहणाऱ्या एका १५ वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाल्याचा आरोप आहे. तिच्याच परिसरात राहणाऱ्या दोन मुलींमार्फत फसवून तिचे न्यूड फोटो काढण्यात आले. ते फोटो व्हायरल करुन तुझ्या आई – बाबांना दाखवेन, अशी धमकी देत तिच्यावर वारंवार बलात्कार करण्यात आला.
एवढंच नव्हे तर त्या मुलीला वाटेल तिथे बोलावून तिच्यावर बलात्कार करण्यात आला. त्रास असह्य झाल्यामुळे पीडित मुलीने तक्रार दिल्यावर आरोपी नराधम आणि त्याला सहकार्य करणाऱ्या दोन मुलींना पोलिसांनी अटक केली.
बुलडाणा जिल्ह्याच्या मलकापूर शहरातील असलेला आरोपी 30 वर्षीय भूषण गजानन बोरसे या नराधमाच्या धमक्यांना बळी पडून वेगवेगळ्या ठिकाणी वेळोवेळी 15 वर्षीय अल्पवयीन पीडित मुलीच्या अब्रूचे लचके तोडण्याचे कृत्य या नराधमाने केले. वेळोवळी होत असलेल्या अत्याचाराला कंटाळून पीडितेने सर्व हकीकत आपल्या घरी सांगितली.
“फक्त प्रस्ताव द्या, निधी आणायची जबाबदारी माझी”
पीडितेच्या आई-वडिलांनी पोलीस स्टेशन गाठले. त्यानंतर पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली असून त्यांच्यावर कलम 376(2) (N), 354 आ (i), 506, 34 आयपीसी सहकलम 4 बा.लै.अ.सं. अधिनियम 2012 नुसार गुन्हा नोंदवला.
0 Comments