जावेद अख्तर यांनी RRS वर टिका केल्याने न्यायलयाने पाठवली नोटीस


जावेद अख्तर आपल्या बेधडक शैलीसाठी ओळखले जातात. तालिबानने अफगाणिस्तानात कब्जा मिळवल्यानंतर अनेकांनी तालिबानच्या कृत्याचा निषेध केला होता. तर काहींची या प्रकरणावरून भाजप आणि आरएसएसवर निशाणा साधला होता. 

आरएसएसचे कार्यकर्ते विवेक चंपानेरकर यांनी जावेद अख्तर यांच्याविरूद्ध खटला दाखल केला आहे. आरएसएसची तुलना तालिबानशी केल्याने ठाण्यातील न्यायालयात हा खटला दाखल झाल्याची माहिती समोर येत आहे. 

न्यायालयाच्या नोटीसीनंतर त्यांना आता येत्या १२ नोव्हेंबर रोजी त्यांना न्यायालयासमोर हजर रहावं लागणार आहे. तालिबान हे जंगली असून त्यांचे कृत्य निंदानीय आहे. भारतात आरएसएस, विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाचे जे समर्थन करतात ते सुद्धा तालिबान सारखेच आहेत, असं जावेद अख्तर यांनी म्हटलं होतं. दरम्यान, जावेद अख्तर यांनी याआधी देखील भाजप आणि आरएसएसवर कडाडून टीका केली होती.

Post a Comment

0 Comments