मंगळवेढा/प्रतिनिधी:
राज्य पोलीस दलातील महिला अधिकाऱ्यांचे व्यक्तिगत पातळीवर धाडसीचे उदाहरणे असंख्य आहेत. सांगली जिल्ह्यातील आटपाडी सारख्या दुष्काळी तालुक्यातून मंगळवेढा विभागाच्या तरुण महिला पोलीस अधिकारी राजश्री पाटील यांचा सामान्य तरुणी ते मंगळवेढा विभागाच्या पहिल्या विभागीय पोलीस अधिकारी म्हणूनचा प्रवास प्रेरणादायी ठरत आहे. कन्या दिनानिमित्ताने विशेष असा त्यांचा प्रवास युवतींसाठी ऊर्जास्रोत ठरत आहे.
भविष्याच्या वाटचालीकडे सदन कुटुंबातून मिळणारी ऊर्जा..
भोसले कुटुंबामध्ये आधुनिक शिक्षणाची फार मोठी परंपरा लाभल्याचे दिसून येते. राजश्री पाटील यांचे वडील संभाजीराव पाटील हे रसायन शास्त्र विषयाचे प्राध्यापक होते. त्यामुळे मुलींना त्यांनी मुलांच्या बरोबरीने शिक्षण दिले. मुलींना योग्य दिशा देण्याबाबत सकारात्मक दृष्टिकोन देण्याचे काम पाटील कुटुंबीयांनी केले. याच प्रेरणेतून राजश्री पाटील यांनी आपले शालेय शिक्षण कन्या शाळेतूनच पूर्ण केले. या शाळेतून शालेय जीवनातूनच आपल्या पैलूंना ओळखण्याची संधी मिळाली. पुढे त्यांच्या पैलूंना आकार देण्याचे काम माध्यमिक शिक्षण व महाविद्यालयीन जीवनामध्ये घडण्यात मदत झाली. महाविद्यालयीन शिक्षणानंतर त्यांनी अभियांत्रिकी महाविद्यालयात टेलिकम्युनिकेशन या शाखेतून अभियांत्रिकी शाखेची पदवी संपादन केली.
स्पर्धा परीक्षेतील साध्या व सोप्या पद्धतीच्या अभ्यासामुळे घवघवीत यश..
टेलिकम्युनिकेशन शाखेतून अभियांत्रिकी पदवी परीक्षा पास झाली त्यानंतर खाजगी क्षेत्रामध्ये मोठ्या पगाराची नोकरी सोडून राजश्री पाटील यांनी शासकीय सेवेमध्ये दाखल होण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असताना वेळेचे काटेकोर पालन व साध्या व सोप्या पद्धतीचा अभ्यास करण्यावर त्यांनी भर दिला. पहिल्याच प्रयत्नात त्यांना नायब तहसीलदार या पदाची संधीही मिळाली मात्र पोलिस दलात जाण्याची आवड असल्यामुळे २०१९ सालच्या स्पर्धा परीक्षेत उपअधीक्षक पोलीस पदासाठी त्यांची नेमणूक करण्यात आली त्यानंतर नाशिक येथील पोलीस अकॅडमी मध्ये खडतर वाटणारी प्रशिक्षणही त्यांनी पूर्ण केले. राजश्री पाटील यांचा विवाह मंत्रालयामध्ये अधिकारी म्हणून काम करणारे विक्रम शिंदे यांच्यासोबत झाला. शिंदे कुटुंबीयांनी राजश्री पाटील यांना प्रोत्साहन देण्याचे काम केले.
मंगळवेढा विभागाला मिळवणारी पहिली महिला पोलीस अधिकारी
मंगळवेढा विभागांमध्ये पोलिस अधिकारी म्हणून राजश्री पाटील यांनी गेल्या सहा महिन्यापासून कारभार पाहत आहे. या सहा महिन्याच्या कालावधीमध्ये पंढरपूर मंगळवेढा विधानसभेच्या पोटनिवडणुकीत ही त्यांनी आपल्या कामाचीच चुणूक दाखवून दिली. यशस्वीरीत्या निवडणूक पार पडली सांगोला व मंगळवेढा पोलीस ठाण्याच्या पोलिस अधिकाऱ्यांना बरोबर घेऊन योग्य असे गुन्ह्याची विश्लेषण करून मार्गी लावण्याचे काम राजेश पाटील यांनी केले आहे. त्या सध्या मंगळवेढा विभागातील एक सक्षम महिला पोलिस अधिकारी म्हणून काम करताना ग्रामीण पोलीस दलात दिसून येतात.
0 Comments