अट्रोसिटी कायद्याचा गैरवापर करणारे धनंजय मुंडे यांच्यावर अट्रोसिटी कायद्या अंतर्गत कारवाई करावी



टेम्भुर्णी/प्रतिनिधी:

करुणा शर्मा मुंडे यांच्यावर परळी येथे खोट्या अट्रोसिटी दाखल करणाऱ्या पोलीस अधिकारी व करायला लावणाऱ्या समाज कल्याण मंत्री धनंजय मुंडे यांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, असे निवेदन बहुजन सत्यशोधक संघाच्या वतीने टेंभुर्णी पोलीस स्टेशनला देण्यात आले निवेदनामध्ये म्हटले आहे की करुणा शर्मा -मुंडे या प्रथमच परळीत आल्या होत होत्या त्यांना संबंधित महिलेची जात कशी माहित किंवा शिव्या देण्याचे कारणही नव्हतं परंतु करुणा शर्मा- मुंडे यांच्यावर कायद्याचा गैरवापर करून खोटी ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल करण्यात आला.

(Advertise)

याचा संघटनेच्या वतीने जाहीर निषेध करण्यात आला, यावेळी बहुजन सत्यशोधक संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणाले की करुणा शर्मा मुंडे यांच्यावर ॲट्रॉसिटी ॲक्ट खोटा  गुन्हा दाखल केला, अनेक गावांमध्ये एस सी. एसटीच्या लोकांवर खूप मोठ्या प्रमाणावर अन्याय-अत्याचार होत असून तेथे ॲट्रॉसिटी गुन्हे दाखल केले जात नाहीत, परळीच्या या प्रकरणावरून आपल्या लक्षात येईल की महाराष्ट्रामध्ये प्रस्तापित व राजकीय लोक खोट्या ॲट्रॉसिटी दाखल करायला लावून एस सी. एसटीला बदनामी करत आहेत, म्हणून परळीतील खोट्या ॲट्रॉसिटी ती चौकशी होऊन संबंधित लोकांवर गुन्हे दाखल करण्यात यावे असे निवेदनात म्हटले आहे,यावेळी न्यू महाराष्ट्र संपादक महावीर वजाळे बहुजन सत्यशोधक संघ जिल्हा उपाध्यक्ष नितीन वाघमारे महादेव लोंढे माळशिरस तालुका अध्यक्ष मोहम्मद भाई शेख माजी सरपंच बाळासाहेब झेंडे खरेदी विक्री संघ माजी संचालक नारायणजी गायकवाड सतीश वाघमारे लखन वाघमारे सुरेश वाघमारे महेश गायकवाड तुकाराम बनसोडे हे उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments