महाराष्ट्रात ४ ऑक्टोबरपासून शाळा सुरू होणार आहेत. राज्य सरकारने शाळा सुरू करण्याला ग्रीन सिग्नल दिला आहे. शाळा सुरू होत असल्या तरी कोरोनाचा धोका टळलेला नाही आणि शाळा सुरू झाल्यानंतर परिस्थिती गंभीर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. याचाच प्रत्यय आला तो जम्मू-काश्मीरमध्ये. जिथं शाळा सुरू होताच तब्बल ३२ विद्यार्थी कोरोना संक्रमित आढळले आहेत.
जम्मू-काश्मीरच्या राजौरी जिल्ह्यातील एका खासगी शाळेतील ३२ विद्यार्थ्यांना कोरोना झाल्याचं निदान झालं आहे. कोरोना नियंत्रणात आल्यानंतर प्रशासनाने दहावी आणि बारावीसाठी शाळा सुरू करायला परवानगी दिली होती. पण हा निर्णय आता महागात पडेल की काय असंच वाटतं आहे. शाळेत येणाऱ्या मुलांची अँटिजेन टेस्ट करावी, असे निर्देश प्रशासनाने दिले होते आणि या टेस्टमध्येच मुलांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे.
काही दिवसांपूर्वी लडाखच्या लेहमध्येही अशीच परिस्थिती झाली होती. कोरोनाची ७१ नवीन प्रकरणं आढळली होती. त्यानंतर प्रशासनाने २ ऑक्टोबरपर्यंत १५ दिवस शाळा पुन्हा बंद करण्याचे आदेश दिले.
0 Comments