विठ्ठल कारखान्यात १७ कोटींचा घोटाळा; संचालक कडे असणाऱ्या कर्जाची माहिती द्या - उद्योगपती अभिजीत पाटील


पंढरपूर तालुक्याच्या राजकारणाचा केंद्रबिंदू असलेल्या श्री विठ्ठल सहकारी साखर कारखाना आर्थिक अडचणीत असतानाच आता कारखान्याच्या संचालक मंडळावर विविध आरोप होऊ लागले आहेत.  

(Advertise)

डीव्हीपी उद्योग समुहाचे अध्यक्ष अभिजीत पाटील यांनी कारखान्याचे अध्यक्ष भगिरथ भालके व त्यांच्या संचालक मंडळावर साखर उतारा चोरुन १७ कोटींचा साखर घोटाळा केल्याचा गंभीर आरोप केला आहे. 

या प्रकरणी सखोल चौकशी करुन संचालक मंडळावर फौजदारी गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी पाटील यांनी केली. त्यांच्या या आरोपानंतर जिल्ह्यातील साखर कारखानदारीत मोठी खळबळ उडाली आहे.

Post a Comment

0 Comments