परंडा/प्रतिनिधी -
गेल्या १० दिवसापासून सुरू झालेल्या गणेशोत्सवाची आज १९ सप्टेंबर रोजी सांगता आहे.श्रीमंतराजे प्रतिष्ठाण कपिलापुरी व शंभूसेना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने
अनंत चतुर्दशी निमित्त सोशल मीडियावर लसीकरण जनजागृती करण्यात आली.
कोरोनाला हारवायचेआहे.
लवकर लसीकरण घ्या.
गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळा.
मास्क वापरा,काळजी घ्या.
वारंवार साबणाने हात धुवा.
गरजूंना मदत करा.
प्रशासनाच्या नियमांचे पालन करा,
असे या प्रकारचे संदेश सोशल मीडियावर प्रसारित करून प्रतिष्ठाणच्या वतीने सामाजिक बांधिलकी जोपली आहे.कोरोना जनजागृती व लसीकरण जनजागृती करत गणपती बाप्पाना निरोप दिला असे प्रतिष्ठाणचे अध्यक्ष रणजीत महादेव पाटील यांनी सांगितले.
0 Comments