बार्शी/प्रतिनिधी:
पोलीस अधिक्षक सोलापुर ग्रामीण यांनी आढावा बैठकीमध्ये दिलेल्या आदेशान्वये बार्शी उपविभागातील पोलीस ठाणेस विविध गुन्ह्यामध्ये जप्त करण्यात आलेला व निर्गतीवर प्रलंबित असलेला जप्त मुद्देमाल फिर्यादीस परत करण्याचे अनुषंगाने उपविभागीय पोलीस अधिकारी अभिजीत धाराशिवकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनय बहीर वैराग पोलीस ठाणे, सहा. पोलीस निरीक्षक शिवाजीराव जायपत्रे बार्शी तालुका पोलीस ठाणे, सहा. पोलीस निरीक्षक सुधीर तोरडमल पांगरी पोलीस ठाणे यांचे उपस्थितीत चोरीस गेलेल्या मोटार सायकल, चारचाकी वाहन, मोबाईल हॅण्डसेट व इतर साहित्य असा एकुण ८,०२,५२०/- रुपये किंमतीचा मुद्देमाल कायदेशीर प्रक्रिया पुर्ण करुन आज दिनांक १३/०९/२०२१ रोजी बार्शी तालुका पोलीस ठाणे येथे मुद्देमाल निर्गती मेळावा कार्यक्रम आयोजीत करुन फिर्यादीस परत देण्यात आला.
0 Comments