काँग्रेस आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये तुंबळ हाणामारी, भाजप खासदारासह अनेक जखमी


एका कार्यक्रमात भाजप आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान हाणामारी  आणि राडेबाजी झाल्याची घटना घडली आहे. उत्तर प्रदेशच्या प्रतापगढमधील सांगीपूर परिसरात एका सार्वजनिक कार्यक्रमात आमनेसामने असलेले दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले. या घटनेत भाजपचे खासदार जखमी झाले आहेत. अशी घडली घटना उत्तर प्रदेशमध्ये सध्या निवडणुकीचं वारं जोरात वाहायला सुरुवात झाली आहे. सांगीपूरमध्ये एका आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं.

या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रमोद तिवारी आणि आमदार आराधना मिश्र हजर होते. काही वेळातच तिथं भाजपचे खासदार संगमलाल गुप्ता त्यांच्या लवाजम्यासह पोहोचले. गुप्ता स्टेजवर जाताच गोंधळाला सुरुवात झाली. दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी एकमेकांची यथेच्छ धुलाई करायला सुरुवात केली.

कार्यक्रमात काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची संख्या तुलनेनं अधिक असल्यामुळे भाजपच्या कार्यकर्त्यांना अधिक मार खावा लागल्याची माहिती मिळत आहे. प्रतिष्ठेच्या प्रश्नावरून हाणामारी स्थानिक सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार काँग्रेसच्या दोन नेत्यांना अगोदर या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे बनवण्यात आलं होतं. दुपारी दोन वाजेपर्यंत काँग्रेसचे नेते प्रमुख पाहुणे होते. त्यानंतर दुपारी तीन वाजल्यापासून भाजप खासदारांना प्रमुख पाहुणे करण्यात आलं.

त्यानंतर दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी घोषणा द्यायला सुरुवात केली. हे घोषणायुद्ध वाढत गेलं आणि कार्यकर्ते एकमेकांना भिडले. खासदार जखमी भाजप खासदार संगमलाल गुप्ता हे या हाणामारीत जखमी झाल्याची माहिती आहे. गुप्तांनी दिलेल्या माहितीनुसार काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांना हाणामारी करायला सुरुवात केली होती.

काही कार्यकर्ते पोलिसांना मारत असल्याचं पाहून आपण जाब विचारला. त्यावर आपल्यालाही काँग्रेस कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याचा दावा खासदार गुप्ता यांनी केला आहे. हे क्रूर! माहेरवाशीण महिलेनं केली धाकट्या बहिणीची हत्या, घरातच केलं दफन काँग्रेसचे स्पष्टीकरण खासदार गुप्ता हे स्टेजवर आल्यानंतर त्यांनी अरेरावी करत माईक ताब्यात घेतला आणि तोडून टाकला.

त्याचा राग आल्यामुळेच कार्यकर्ते भडकले, असा आरोप काँग्रेसनं केला आहे. अखिलेश यादव यांची प्रतिक्रिया उत्तर प्रदेशमध्ये भाजपच्या राज्यात खासदारही सुरक्षित नसल्याची प्रतिक्रिया समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी दिली आहे. भाजप सरकारनं ज्या प्रकारे हिंसेचं समर्थन केलं, त्याचे परिणाम या घटनेतून दिसत असल्याची टीका त्यांनी केली आहे. निवडणुका तोंडावर उत्तर प्रदेशच्या निवडणुका तोंडावर आल्यामुळे सार्वजनिक कार्यक्रमांचं प्रमाण वाढत चाललं आहे. प्रत्येक पक्ष मतदारांना आकर्षित करण्याची संधी सोडत नाही. त्यातूनच हा संघर्ष उभा राहिल्याचं चित्र उत्तर प्रदेशमध्ये दिसत आहे.

Post a Comment

0 Comments