बुलडाणा तालुक्यातील एका छोट्याशा गावात अल्पवयीन १७ वर्षीय तरुणीने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना गेल्या सात दिवसांपूर्वी घडली होती. आता या मुलीच्या हस्ताक्षरात लिहून ठेवलेली सुसाईड नोट घरात आढळली आहे. त्यामुळे आत्महत्येच्या कारणाचा खुलासा झाला आहे.
ज्यामध्ये या मुलीवर गावातीलच दोन तरुणांनी लैंगिक अत्याचार केल्याचा उल्लेख आहे. त्यांना कंटाळून या तरुणीने आत्महत्या केल्याचे नोटमध्ये लिहून ठेवले आहे. दोन दिवसानंतर सप्टेंबर रोजी घरात ठेवलेल्या भगवद्गीता या ग्रंथांमध्ये या अल्पवयीन मुलीने स्वतःच्या हस्ताक्षरात लिहून ठेवलेली सुसाईड नोट तिच्या वडिलांना आढळली. या सुसाईड नोटमध्ये तरुणीने तिच्यासोबत घडलेला सर्व प्रसंग नमूद केला आहे. बदनामी आणि तिच्यावर वारंवार सुरू असलेल्या लैंगिक अत्याचाराला कंटाळून त्या तरुणीने आपण जीवनयात्रा संपवत असल्याचे लिहून ठेवले आहे.
त्यामुळे मृत तरुणीच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून २२ सप्टेंबर रोजी गावातीलच आरोपी सुनील उर्फ गणेश काळवाघे (२४ वर्षे) आणि २२ वर्षीय निलेश मिसाळ याच्यावर बलात्कारासह पॉस्को अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यांना पोलिसांनी अटक केली आहे.
0 Comments