बार्शी/प्रतिनिधी:
वारकरी संप्रदायातील कीर्तन ही परंपरा माणसाला धर्म विचार याच्यातून समाज प्रबोधन करण्याचे काम करते कीर्तन म्हणजे व्याख्यान किंवा भाषण नाही तर धर्म, आचार, विचार, सत्कार्यासाठी आणि मनुष्याला माणुसकीची जाणीव करून कसे वागावे हे शिकवते. पण आता ह्यात बदल झालेला पाहायला मिळतोय चांगलं भाषण आणि लोकांचं मनोरंजन जमत असेल तर धोतर आणि फेटा बांधून मोठमोठाले पैश्यांची पाकीट घेणाऱ्यांची संख्या वाढली आहे.
बिग बॉस ३ मधील कीर्तनकार शिवलीला पाटील ह्यांच्या सहभागामुळे अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे. एकमेकांचे पाय ओढून स्वतः टिकून राहायच्या ह्या वादग्रस्त कार्यक्रमात एका कीर्तनकार महिलेने सहभाग घेणे योग्य नाही असे अनेकांचे मत आहे. शिवलीला पाटील ह्या कीर्तनकार कमी आणि विनोद करणाऱ्या वक्त्या जास्त असल्याचं म्हटलं जात. इतक्या कमी वयात त्यांनी अमाप प्रसिद्धी मिळवली होती.
सोशल मीडियावर देखील त्यांचा मोठा चाहता वर्ग पाहायला मिळत होता. झी वाहिनी वरील “गजर कीर्तनाचा सोहळा आनंदाचा” ह्या कीर्तन कार्यक्रमात देखील त्यांनी अनेकदा कीर्तन केलेलं पाहायला मिळालं. पण ह्या महामारीच्या काळात लोक घरी बसून कीर्तन पाहणाऱ्यांची संख्या जास्त असल्या कारणानेच बिग बॉसच्या टीमने त्यांना घरात घेतले असल्याचं बोललं जातंय.
प्रसिद्धी आणि पैश्यासाठी वाट्टेल ते असच चित्र ह्यामुळे पाहायला मिळतंय. बिग बॉस ३ मधील कीर्तनकार शिवलीला पाटील ह्यांच्या सहभागामुळे फक्त प्रेक्षकांनीच नाही तर आता वारकरी संप्रदायातून देखील आता निषेध दर्शविताना पाहायला मिळतो आहे. कीर्तनकारानी समाजाला कस वागायचं ह्याची शिकवण देण्याचे मोलाचे काम वर्षानुवर्षे केलं आहे ह्याचे भान ठेवणं गरजेचं आहे.
0 Comments