सोनू सूदच्या घरी इन्कम टॅक्सची धाड, सलग १४ तासांपासून चौकशी सुरु



 बॉलिवूड अभिनेता सोनू सूदच्या घरी आयकर विभागाची पडताळणी सुरू आहे. यावेळी आयकर विभागाचे मोठे अधिकारी सोनू सूदच्या घरी उपस्थित आहेत. मुंबईतील सोनू सूदच्या एकूण ६ जागांवर आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांची पाहणी सुरू आहे. 

विशेष म्हणजे दिल्ली सरकारने अलीकडेच सोनू सूदला मेंटरशिप कार्यक्रमाचं ब्रँड ॲम्बेसेडर बनवलं होतं. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. 
(Advertise)

 लॉकडाऊन दरम्यान लाखो लोकांना घरी पोहचण्यासाठी सोनू सूदनं मदत केली होती. तेव्हापासून गरिबांसाठी सोनू  सूद हा रिअल लाईफ हिरो ठरला होता. अभिनेता सोनू सूदच्या सोशल मीडियावर जर कोणी मदतीसाठी विनंती केली तर तात्काळ सोनू सूदकडून त्या मेसेजची दखल घेतली जाते. 

‘देश के मेंटर’ कार्यक्रमाचा ब्रँड ॲम्बेसेडर

आम आदमी पार्टीच्या दिल्ली सरकारने चित्रपट अभिनेता सोनू सूदला ‘देश के मेंटर’ कार्यक्रमाचा ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून नियुक्त केले आहे; परंतु ही नियुक्ती पंजाबमधील निवडणुका दृष्टिक्षेपात ठेवून करण्यात आल्याचा आरोप भाजपने केला होता. 

सूदची कोरोना महामारीदरम्यान त्याच्या मानवतावादी कार्यासाठी संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रमाद्वारे सन्माननीय २०२० विशेष मानवतावादी कृती पुरस्कारासाठी निवड करण्यात आली.

Post a Comment

0 Comments