माजी आमदार राहुल भैया मोटे साहेब यांची बानगंगा सहकारी साखर कारखान्याच्या विस्तारीकरण कामाची पाहणी



जवळा/प्रतिनिधी:

दिनांक १९ सप्टेंबर २०२१ रोजी सकाळी बाणगंगा कारखान्याचे चेअरमन माजी आमदार राहुल भैया मोटे  यांनी भूम-परंडा-वाशी विधानसभा क्षेत्रातील विकासाचा केंद्रबिंदू ठरलेल्या बाणगंगा सहकारी साखर कारखाना लिमिटेड इडा जवळा येथील कारखान्याच्या विस्तारीकरण कामाची पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांना काम लवकर करून येणाऱ्या २०२१-२२ च्या गळीत हंगामात कारखाना लवकर सुरू करण्याच्या बाबत सूचना देण्यात आल्या, भूम-परंडा-वाशी विधानसभा क्षेत्र पर्जन्याचे प्रमाण जास्त असल्यामुळे, ऊस लागवडीचे क्षेत्र वाढले आहे, ऑक्टोबर महिन्यामध्ये गळीत हंगाम सुरू होणार असल्यामुळे,  ही बाब लक्षात घेऊन ऊस उत्पादक शेतकऱ्यांची गैरसोय होऊ नये या उदात्त हेतूने संचालक मंडळाने बाणगंगा कारखान्याचे विस्तारीकरण करण्याचा निर्णय घेतला, व येणाऱ्या काळात विधानसभा क्षेत्रातील सर्व शेतकर्‍यांचा ऊस गाळप  झाला पाहिजे यासाठी नियोजन केलेले आहे. 

(Advertise)

कारखान्याचे एमडी श्री रणवरे साहेब, फॅक्टर इन्चार्ज संतोष कुमार तोंडले साहेब, चीफ इंजिनियर शिंदे साहेब यांना काम लवकर करून कारखाना लवकर चालू करावा याबाबत सूचना देण्यात आल्या.

त्यावेळी कारखान्याचे व्हाईस चे चेअरमन महादेव बाबा खैरे, भूम तालुका अध्यक्ष हनुमंत पाटोळे, माजी सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती भूम संजय पाटील आरसोलीकर. कारखान्याचे मॅनेजिंग डायरेक्टर श्री रणवरे साहेब, चीफ केमिस्ट संतोष कुमार तोंडले, चीफ इंजिनियर शिंदे साहेब, व इतर कर्मचारी उपस्थित होते

Post a Comment

0 Comments