दरमहा १० टक्के व्याजाने पैसे देतो, असे सांगून शिक्षिकेवर बलात्कार केला. तसेच विवस्त्र अवस्थेतील फोटो काढून पैसे दिले नाहीत. मी रिटायर एसीपी आहे, तुला व तुझ्या घरच्यांना मारून टाकीन, अशी धमकी दिली. सांगवी ठाण्याच्या हद्दीत डिसेंबर २०१९ ते ८ ऑगस्ट २०२१ या कालावधीत ही घटना घडली.
पीडित महिलेने याप्रकरणी शुक्रवारी (दि. १०) सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. विकास अवस्ती (रा. पिंपळे गुरव), असे आरोपीचे नाव आहे. फिर्यादीला पैशांची अडचण होती. त्यामुळे त्यांनी ओळखीने आरोपी विकास अवस्ती याच्याकडे पैशांची मागणी केली. दरमहा १० टक्के व्याजाने पैसे देतो, असे म्हणून आरोपीने फिर्यादी महिलेकडून दोन कोऱ्या धनादेशांवर व कोऱ्या कागदावर सह्या घेतल्या. त्यानंतर फिर्यादीला शीतपेय देऊन जबरस्तीने लैंगिक अत्याचार केले. तसेच विवस्त्र अवस्थेतील फोटो काढून घेऊन फिर्यादीला पैसे दिले नाहीत.
आरोपी हा फिर्यादीच्या कामाच्या ठिकाणी गेला. तू जर नाही आली तर विवस्त्र अवस्थेतील फोटो तुझ्या घरच्यांना दाखवून तुझी बदनामी करतो, अशी धमकी आरोपीने दिली. मी रिटायर एसीपी आहे, माझे कोणीही काहीही वाकडे करू शकत नाही, अशी धमकी देऊन आरोपीने जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केले. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.
0 Comments