शिक्षकी पेशाला काळीमा! विद्यार्थिनीशी अश्लील चाळे करणाऱ्या शिक्षकाला गावकऱ्यांनी दिला चोप



यवतमाळ जिल्ह्यातील बेलोरा येथील शाळेतील एका शिक्षकाने शिक्षकी पेशाला काळीमा फासणारी गोष्ट केली आहे. आपल्या विद्यार्थिनीशी अश्लील चाळे करुन त्रास दिला आहे. अरुण राठोड असं या नराधमाचं नाव आहे. धक्कादायक बाब तर ही आहे की या शिक्षकाला आदर्श पुरस्कार भेटला आहे. 

अरूण राठोड याने पीडित विद्यार्थिनीला चांगले गुण मिळवून देण्याचं आमिष दाखवलं होतं. गेल्या महिन्याभरापासून तो पीडित विद्यार्थिनीवर अत्याचार करत होता. अखेर ही गोष्ट गावातील तरुणांना कळाली. त्यानंतर पीडितेचे नातेवाईक आणि तरुणांनी शाळेत जाऊन अरुण राठोडला जाब विचारला आणि चांगलाच चोप दिला. गावकऱ्यांनी या शिक्षकाला कपडे फाटेपर्यंत मार दिला आहे.

या घटनेचा सर्वत्र निषेध व्यक्त केला जातोय. या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळी दाखल होऊन त्या शिक्षकाला ताब्यात घेतलं.

Post a Comment

0 Comments